मुक्तपीठ टीम
पृथ्वीच्या दिशेने घोंघावत येत असलेले मेड इन चीन असणारे नवे संकट म्हणजे चीनचे महाकाय रॉकेट. चीनचे लाँग मार्च 5 बी हे महाकाय रॉकेट अवकाशात अनियंत्रित झाल्याने नवा धोका निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मानवी नियंत्रणाबाहेर गेलेले हे रॉकेट प्रति सेकंद 4 मैलांच्या वेगाने ते पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे रॉकेट चीनने नेमके अंतराळात का पाठवले, चीनची नेमकी त्यामागची महत्वाकांक्षा तरी काय, हेही समजून घेणे महत्वाचे आहे.
‘लाँग मार्च 5 बी’ us अंतराळात अनियंत्रित झालेले हे रॉकेट २१ टन वजनाचे आहे. चीनने गुरुवारी ५ मार्च रोजी रॉकेटचे प्रक्षेपण केले. त्यानंतर ते अनियंत्रित झाले. त्यातच ते पृथ्वीच्या दिशेने अतिवेगाने येत आहे. त्यामुळे ते पृथ्वीवर जिथे कोसळेल तिथे कोठेही विध्वंस आणू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
We now officially have 2 space stations up on the sky! Congratulation China and CNSA! pic.twitter.com/7QjHoNy5kE
— Theodore (@sixtheodore) April 29, 2021
चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम
-
- अंतराळात चीन स्वत:ची अंतराळ स्थानकं म्हणजेच स्पेस स्टेशन्स बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.
- अवकाशातील अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी चीनने गुरुवारी स्वत: च्या अंतराळ स्थानकाचे पहिले कोर कॅप्सूल मॉड्यूल लॉन्च केले. येत्या काही दिवसांत उर्वरित अवकाश स्थानकदेखील अशाच अनेक प्रक्षेपणांद्वारे अवकाशात पाठवले जाईल. या वर्षाच्या अखेरीस आपले पहिले अवकाश स्थानक सुरू करण्याची योजना चीनने आखली आहे.
- आतापर्यंत फक्त रशिया आणि अमेरिकेने असे केले आहे.
- सध्या अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाचेच आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र कार्यरत आहे. चायना अॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (सीएएसटी) च्या अंतराळातील मुख्य मुख्य डिझाइनर बाई लिन्हो म्हणाल्या की टीआनहे विभाग मॉडेल स्पेस स्टेशन टियांगोंगचे व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र म्हणून काम करेल आणि एकाच वेळी तीन अंतराळ यान उभारण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- चीनने आपल्या अंतराळ स्थानकाचे नाव टियांगोंग ठेवले आहे.
- चिनी भाषेत याचा अर्थ स्वर्गातील राजवाडा आहे.
- चिनी अंतराळ स्थानक १५ वर्ष काम करेल
- या मल्टीमोडल स्पेस स्टेशनमध्ये प्रामुख्याने तीन भागांचा समावेश असेल, ज्यात स्पेस कॅप्सूल आणि दोन लॅब असतील.
- या सर्वांचे एकूण वजन सुमारे ९० मेट्रिक टन असेल.
- अंतराळ स्थानकाच्या मुख्य कॅप्सूलचे नाव तिआन्हे आहे, ज्याचा अर्थ स्वर्गातील संवाद आहे.
- या अंतराळ स्थानकाचे काम या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल, असा दावा चीनी अंतराळ वैज्ञानिकांनी केला आहे.
- त्याचे आयुष्य अंदाजे १५ वर्षे आहे.
- चिनी कोर कॅप्सूलची लांबी ४.२ मीटर आहे आणि आकारमान १६.६ मीटर आहे.
- या ठिकाणाहून संपूर्ण स्पेस स्टेशन चालविण्यात येईल.
- या ठिकाणी राहून अंतराळवीर संपूर्ण अवकाश स्थानक नियंत्रित करू शकतील.
- या कॅप्सूलमध्ये कनेक्टिंग सेक्शनचे तीन भाग असतील, एक लाइफ-सपोर्टसह, दुसरा कंट्रोल सेक्शन आणि तिसरा रिसोर्स सेक्शन.
- मध्यभागी मुख्य मॉड्यूलसह, चीनच्या अंतराळ केंद्राचे आकार इंग्रजी टीसारखे असेल, तर दोन्ही बाजूंच्या लॅब म्हणून वापरल्या जातील. प्रत्येक मॉड्यूलचे वजन २० टन आहे.
下一步,中国和俄罗斯将在月球轨道建空间站,然后在月球建立基地。 pic.twitter.com/e4xejxyIZ6
— XIJIN LI (@XijinLi) April 29, 2021
याआधीची संबंधित बातमी नक्की वाचा:
कोरोनानंतर पृथ्वीसाठी चीनचे नवे संकट! कुठेही कोसळू शकते अनियंत्रित झालेले २१ टनी रॉकेट!!