मुक्तपीठ टीम
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप घेतले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड, औषध आणि ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचवेळी आता गरजूंच्या मदतीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रिकेटपटू पुढे येऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत.
अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी १०० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या कुटुंबाने ग्रामीण भागासाठी २०० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक कोटी मदत जाहीर केली आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीसाठी सात लाख देणगी दिली आहे. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स (डीसी) फ्रँचायझींनी २.५० कोटी रुपये दान केले आहे.
अभिनेता अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी एक चांगलं पाऊल उचललं आहे. ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर करत लिहिले, “लंडनच्या दोन डॉक्टर्सनी १२० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी आणि अक्षयने १०० ऑक्सिजन काँसन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे एकूण २०० काँसन्ट्रेटरचं दान केले जाणार आहे. एकत्र येऊन योगदान करुयात.”
A big shout out to all of you who joined me in donating toward this good cause by Daivik Foundation. Here are the oxygen concentrators all ready to ship. #StayStrongIndia pic.twitter.com/1f7nYAMSq0
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) May 1, 2021
ट्विंकल खन्नाने त्याआधी एका पोस्टमध्ये लिहिले होते, ‘कृपया मला रजिस्ट्रेशन झालेल्या आणि विश्वासार्ह एनजीओंची माहिती द्या, ज्या १०० ऑक्सिजन काँसन्ट्रेटरचे वाटप करण्यास मदत करतील हे काँसन्ट्रेटर थेट लंडनवरून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील.’
क्रिकेटर हार्दिक पंड्या यांनीही पोस्ट केली आहे. हार्दिक म्हणाला की, आम्ही ग्रामीण भागासाठी २०० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर देण्याचे ठरविले आहे. मला असे वाटते की, ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. आपल्या देशातील परिस्थिती आपल्याला सर्वांना चांगली माहिती आहे. या स्थितीत कोरोनाशी लढा देणारा प्रत्येकजण, फ्रंट लाइन वर्कर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांसह या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. परिस्थिती पाहून, कुणाल, मी आणि विशेषतः माझ्या आईनेही आमच्या वतीने मदत करण्याचा निर्णय घेतला.
— hardik pandya (@hardikpandya7) May 2, 2021
मिशन ऑक्सिजनने सोशल मीडियावर सांगितले की, संघटनेला सचिन तेंडुलकर कडून १ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही संस्था २५० हून अधिक तरुण उद्योजकांची बनलेली आहे. हे परदेशातून ऑक्सिजन काँसन्ट्रेटर आयात करीत आहे आणि त्यांना रुग्णालयात पुरवित आहे. सचिनने सोशल मीडियावरही या संस्थेची माहिती दिली आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने दिल्ली एनसीआरची स्वयंसेवी संस्था हेमकुंट फाउंडेशन आणि उदय फाउंडेशनला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या संस्था ऑक्सिजन सिलिंडरपासून कोरोनावरील उपचारापर्यंत इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्यात गुंतलेली आहेत.
पाहा व्हिडीओ: