मुक्तपीठ टीम
कोरोनासाठीच्या विशेष मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोरोना मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
- बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
- शाखा कोड 00300
- आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (G) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते.