मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत दीड महिन्यानंतर पॉझिटिव्हिटी दर मंदावत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुहन्मुंबईकडून जारी केलेल्या आकडेवारी नुसार, शहरात गेल्या २४ तासात ४३,५२५ नागरिकांची टेस्ट केली असून यातील केवळ ३९२५ नागरिक कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. या आकड्यात काही बदलही होऊ शकतो.
मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक
- १३ मार्च २०२१ रोजी कोरोनाचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर ९.४८ टक्के होता.
- त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण केले.
- २० मार्चला पॉझिटिव्हिटी दराने १५ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता.
- एप्रिलमध्ये पॉझिटिव्हिटी दर ११ ते २७ टक्क्यांच्या जवळ पोहचला होते.
- पण ४५ दिवसांनी पॉझिटिव्हिटी दर काहीसा मंदावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
- तसेच शहरातील एकूण पॉझिटिव्हिटी दर पाहिला तर तो ११.९ टक्के आहे.
सातत्याने कमी होताना दिसली बांधितांची संख्या
- एकूण चाचण्यात आढळलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांच्या टक्केवारीनुसार पॉझिटिव्हिटी दर निश्चित केले जाते.
- मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी गेले काही दिवसांपासून नवीन रुग्ण आढळण्याची गती मंदावली आहे.
- ४ एप्रिलला मुंबईत एकूण ११,२०६ रुग्ण आढळले होते.
- १५ एप्रिलला ८,२०९ नवीन रुग्ण आढळले होते.
- २४ एप्रिलला ५,८६७ रुग्ण आढळले होते.
- तर २६ एप्रिल रोजी ३,८४० रुग्ण आढलले होते.
- आज ३० एप्रिलला ३९२५ रुग्ण आढळले आहेत.
- या आकडेवारीवरून हे लक्षात येते की सातत्याने नवीन रुग्णांमध्ये घट होत आहे.