मुक्तपीठ टीम
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना उपचारात महत्वाचे मानले जात असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार देखील सुरू आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी आता चोरटेही केमिस्टच्या दुकानांमध्ये घरफोडी करु लागले आहेत. त्यांचे सध्या एकच लक्ष्य दिसत आहे ते म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शन. मुंबईतील कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी सुर्यकांत पवार आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत आरोपी करीम साब उल्ला खानला जेरबंद केले आहे. इतरही ठिकाणी रुग्णालयांमधून रेमडेसिविरच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
टीव्हीवर काळाबाजार कळला, चोरीचा कट रचला!
• करीन साब उल्ला खान (वय २४ वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
• न्यूज चॅनलवर रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढल्याचं ऐकलं.
• हे इंजेक्शन चोरले तर ब्लॅकमध्ये मोठ्या किंमतीत विकू शकतो, असं त्याच्या डोक्यात आलं.
• त्यामुळेच केमिस्टची दुकाने फोडून इंजेक्शनची चोरी केली, असा कबूली जबाब चोरट्याने दिला आहे.
• त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या इतरही दुकानांमध्ये त्याने चोरी केली आहे.
• आता पर्यंत या चोरट्याने वांद्रेपासून बोरीवलीपर्यंतच्या बारापेक्षा जास्त दुकानांमध्ये चोरी केली आहे.
सीसीटीव्हीमधून पटली ओळख
• कांदिवली पोलिसांनी सुरुवातीला सर्व मेडिकलच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहिले.
• त्यामध्ये चोरटा एकच असल्याचं समजले.
• पोलिसांनी मेडिकल दुकानांच्या आजूबाजूच्या परिसरातीलही सीसीटीव्ही बघितले.
• त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावरच ओशिवरा येथून अटक केली.
• विशेष म्हणजे चोरटा हा नुकताच जेलमधून सुटून आला होता