मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आज सकाळी दहा वाजता कोरोनामुळे त्यांचं निधन झाले. निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. काळ बदलला, काँग्रेसही बदलली, पण एकनाथ गायकवाड मात्र मनानं कायम काँग्रेसीच राहिले. त्यांचं जगणंही कायम राहिलं ते त्यांच्या धारावीसाठी. त्यांचा श्वास आणि ध्यास हा फक्त आणि फक्त धारावीच होता.
एकनाथ गायकवाड ठळक माहिती
- मुंबई, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते
- कुठल्याही वादात न पडता शांतपणे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत
- कायम काँग्रेस आणि फक्त काँग्रेसलाच आपलं सर्वस्व मानत.
- मुंबईतील धारावी भागात त्यांच्या राजकारणाचे केंद्र होते.
- धारावीतील झोपडपट्टीवासीयांच्या कल्याणासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
- काँग्रेसतर्फे ते विधानसभेवर धारावी मतदारसंघातून निवडून गेले होते.
- राज्याच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.
- धारावी भाग असलेल्या उत्तर मध्य मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना लोकसभा निवडणुकीत पराभत केल्यापासून त्यांना जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले.
- एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते.
- त्यानंतर शिवसेनेचे राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही गायकवाड स्वस्थ बसले नाहीत.
- प्रतिकुलतेतही त्यांनी त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांना धारावीतून विधानसभेवर निवडून आणले.
- त्यानंतरही ते सतत काँग्रेसच्या विचारधारेला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी कार्यरत होते.
एकनाथ महादेव गायकवाड यांची कारकीर्द
जन्म – १ जाने १९४० ,सातारा
मुले – २ मुली व २ मुले
आमदार मतदारसंघ – धारावी
१) १९८५-९०
२) १९९०-९५
३) १९९९-२००४
१९९३-९५- राज्यमंत्री
१९९९-२००४ – राज्यमंत्री , आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती त्यांनी भुषविली होती
खासदार
१)२००४ -२००९
२) २००९-२०१४
मुंबई काँग्रेस अध्यक्ष- २०१७-२०२०