मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई, नाशिक, विरार येथील रुग्णालयांमधील दुर्घटनांनंतर आता ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटीकेअर सेंटर या रुग्णालयांमध्ये बुधवारी सकाळी पहाटे पावणे चार वाजता भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील सहा रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर रुग्णांना सोडण्यात आली.
सदर आगीच्या घटनेत मृत्यूमुखी झालेल्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना १ लाख देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2021
मृतांची नावे:
- यास्मिन जफर सय्यद (वय ४६)
- नवाब माजिद शेख ( वय ४७)
- हालिमा बी सलमानी ( वय ७०)
- सोनावणे
Fire breaks at Prime Hospital in Mumbra, Thane around 3:00AM today.
One dies out of 7 ICU patients and others are shifted to nearby hospitals, no updates on the health of all shifted patients. confirmation on the reason behind the fire break.#PrimeHospital #Fire #Kausa #Mumbra pic.twitter.com/7x3s7Bphip— Fauzan Tanaji (@FauzanTanaji) April 28, 2021
Fire breaks out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane#mumbra #thane #mumbai #hospitalfire #fire #primecriticarehospital pic.twitter.com/j9BEdiGgoN
— Mahmood Raza (@raza_8822) April 28, 2021