मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत कस्टमर सपोर्ट अॅन्ड सेल्स विभागासाठीच्या ज्युनियर असोसिएट लिपिक या पदासाठी एकूण ५,१२१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: