Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लस मोफतच द्या! कुणालाही लसीविना राहण्याचे निमित्त नको!! ऐपत त्यांनी मुख्यमंत्री निधीला देणगी द्यावी!

September 6, 2026
in सरळस्पष्ट
0
vaccination

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

 

महाराष्ट्रात युवापिढीच्या लसीकरणाचे काय होणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आधीपासून ६० वरील आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. त्यांचे मोफत आहे. मात्र, युवावर्गाला मोफत द्यायचे की त्यात आर्थिक निकषांवर काहींकडून शुल्क घ्यायचे, यावर चर्चा सुरु आहे.

 

नेमकं काय ते बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. पण त्याआधीच आघाडीतील मत-मतांतरे दोन दिवस सगळीकडे पसरलीत. बाहेर कुणी काहीही बोलले तरी राजकारण्यांना जे करायचे असते, ते बंद दाराआडच्या बैठकीत ठरवून ते करतातच करतात. त्यामुळे बुधवारी नेमकं काय जाहीर होईल ते होईल, फक्त त्याच्या परिमाणांविषयी बोलणे आवश्यक आहे.

 

माझ्या मते लसीकरण मोफतच असले पाहिजे. त्याचे कारण लसीकरण ही आता केवळ एखाद्याची वैयक्तिक गरज राहिली नसून आपल्या सर्वांची सामूहिक गरज आहे. लसीकरण झाले आणि त्यातून कोणत्याही कारणाने काही सुटले किंवा दूर राहिले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतील. भविष्यात कोरोना विषाणूंच्या असे जिवंत चालते-फिरते स्प्रेडर आपल्याला परवडणार नाहीत. त्यामुळेच सरसकट सर्वांचे आणि मोफत लसीकरण झालेच झाले पाहिजे. त्यात कोणताही अन्य निकष लावलाच जाऊ नये.

 

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाविषयी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले राज्याने युवावर्गाच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली तर किमान सात – आठ हजार कोटींचा खर्च येईल. रक्कम नक्कीच मोठी आहे. पण सरकारला तरीही लसीकरण मोफतच करावे, असे वाटते. त्याचे कारण लसीकरणाविषयी समाजातील एका मोठ्या वर्गात असलेले गैरसमज. एक मोठा वर्ग, त्यात सुशिक्षितही आहेत, विनाकारण डोक्यात गैरसमजांचे ओझे घेऊन फिरतो. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यातील अनेक ते ओझे दूर फेकायला तयार नसतात. उलट ते ओझे दुसऱ्यांच्या डोक्यावरही वाढवत आपलं तसंच वाढवत आहे. ज्ञान दिल्याने वाढते. दुर्दैवाने इथे गैरसमज म्हणजे अज्ञानाच्या बाबतीतही तसेच दिसते. जर सरसकट मोफत लसीकरण ठेवले तर अशा वर्गाला लसीकरण टाळण्यासाठी एक कारण उरणार नाही.

 

लसीकरण मोफत करायचे ते केवळ या गैरसमजवाल्यांना घाबरून नाही. त्याचबरोबर आणखी एक समस्या पुढे येऊ शकेल. मी पैसे देतो आहे, तर मला अमूकच ब्रँडची लस पाहिजे, तरच घेईन, असे जर सुरु झाले, तर भलतीच समस्या उद्भवेल. आताही तुम्ही ती लस का घेतलीत, ती दुसरी जास्त चांगली आहे, असे मलाही सांगणारे अनेक सुशिक्षित हितचिंतक भेटलेत. त्यात छुप्या मार्गाने फार्मा लॉबीही भर घालू शकतील. त्यामुळे एक विशिष्ट लस उपलब्ध असेल, पण दुसरी पाहिजे म्हणून ती घेतली जाणार नाही. सध्याच मोठी टंचाई आहे ती या कारणामुळे विचित्र प्रकारे वाढेल.

 

अर्थात लस मोफत दिल्यामुळे सरकारवर प्रचंड आर्थिक भार येणारच. पण कोरोना संसर्ग साखळी तोडण्याच्या निर्बंधांमुळे जी आर्थिक हानी होत आहे, त्याच्याशी तुलना करता हा खर्च योग्य वाटेल. तसेच हा भारही सरकार इतर मार्गाने भरून काढू शकते.

 

मोफत लसीकरणासाठीचा सरकारी भार कमी करण्यासाठी काही सूचना:

  • लस घेणाऱ्यांसाठी एक ऐच्छिक पर्याय असावा. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी लस घेताना मुख्यमंत्री निधीसाठी एक हजार रुपये मदत करावी. त्यासाठी मुख्यमंत्री निधीत एक वेगळा लस हेड तयार करु शकतात.
  • आमदार आणि खासदारांच्या विकास निधीतून ५० टक्के घेतले तरीही किमान हजार कोटींचा निधी उभा राहिल.
  • मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून ठराविक विभागातील लसीकरणाचा खर्च प्रायोजित करून घेणे. त्या बदल्यात त्यांना त्या परिसरात फलक जाहिरातीचे हक्क देणे.
  • जिल्हा, शहर स्तरावर अनेक सहकारी, खासगी बँका, मल्टिस्टेट, शिक्षणसंस्था कार्यरत असतात त्यांना त्या-त्या भौगोलिक विभागासाठी लसीकरण प्रायोजित करणे अशक्य नाही. त्यांनाही जाहिरात आणि इतर मार्गाने त्याची भरपाई मिळू शकेल.
  • हे सारे नको असेल तर अर्थातच सोपा मार्ग. पेट्रोल, डिझेल या इंधनांवर लस अधिभार लावणे. आधीच खूप कर आहेत. पण नाइलाज असेल.

Tags: chief minister uddhav thackeraycorona vaccinationHealth Minister Rajesh Topeआरोग्य मंत्री राजेश टोपेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री निधीमोफत लसीकरण
Previous Post

भिवंडीतील कोरोना जंबो रुग्णालय सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून पूर्ण क्षमतेनं चालवण्याची मागणी

Next Post

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील इतरांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार! न्यायालयाचा दिलासा! 

Next Post
whatsApp

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील इतरांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसणार! न्यायालयाचा दिलासा! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!