मुक्तपीठ टीम
देशात सध्या कोरोनाविरुद्ध लढा सुरु आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील लोकांना कोरोना लसीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे पात्र भारतीय नागरिक को-विन अॅप किंवा आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करु शकतात.
सध्या देशात ४५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जात आहे. तर १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण सुरु केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासंबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
लसीकरणासाठी अशी करा नोंदणी…
- १८ ते ४५ वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु होणार आहे.
- लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया बुधवार, २८ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
- कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरुन तसेच https://www.cowin.gov.in या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल.
- नोंदणीसाठी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड असे ओळखपत्र आवश्यक आहे.
- लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आणि अपॉइनमेन्ट घेणे अनिर्वाय असणार आहे.
- नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन एसएमएस येईल.
- मोबाइलवर येणाऱ्या एसएमएसवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- लसीकरणावेळी स्लिप आणि फोटो आयडी जवळ ठेवणे आवश्यक आहे.
- तुम्हाला कळवण्यात आलेल्या तारीख, वेळ आणि सेंटरवर वेळेत पोहचा.
- कोरोना लसीकरणासाठी विशिष्ट लसीचा आग्रह धरू नका.
- कोरोना लसीच्या पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी निर्धारित तारखेला पुन्हा लसीकरण केंद्रात जा.
- लसीकरणाचा दुसरा डोसही आधी ज्या लसीचा डोस घेतला त्याचाच दिला जाईल.
- लसीकरणानंतर कोरोना विषाणूंपासून संरक्षण वाढत असले तरी मास्कसह सुरक्षा नियम पाळा.
पाहा व्हिडीओ: