Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्राच्या सरकारी विभागांची सर्व रुग्णालयं नागरिकांसाठी खुली करा! वर्षा देशपांडेंची मागणी!!

April 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
varsha deshpande

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या सर्व विभागांची आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांची त्यांच्या वापरासाठीची देशभरातील सर्व रुग्णालयं सामान्यांसाठीही खुली करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणीही केली आहे. मुंबई परिसरात अशी अनेक रुग्णालयं आहेत. त्यातील पनवेल परिसरातील ओएनजीसी, बीओसीची दोन मोठी रुग्णालयं तर गेली काही वर्षे बंद पडली आहेत. तीही त्या संस्थाकडे बसून असलेल्या मनुष्यबळाचा वापर करत कार्यरत करता येतील, अशीही सूचना वैद्यकीय क्षेत्रातील माहितगारांकडून पुढे आली आहे.

अॅड. वर्षा देशपांडे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात उपलब्ध आरोग्य सुविधांच्या कमाल उपयोगाचा मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी विनंती केली की, ईएसआयसी, सीएचएस, रेल्वे, संरक्षण खाते, बीएआरसी, ओएनजीसी, सेल इत्यादी रुग्णालये जी प्रामुख्याने केवळ नोंदणीकृत लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहेत, त्यांना पुढच्या १८० दिवसांकरिता सर्व नागरिकांसाठी खुले करावे. जेणेकरून ती रुग्णालयं कोरोना साथीच्या या संकटकाळात त्यांची जास्तीत जास्त क्षमता उपयोगात आणू शकतील.

त्या पुढे म्हणाल्या की, सध्याची कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. आणि सरकारकडून केले जाणारे प्रयत्न हे अपुरे पडत आहेत. म्हणूनच त्यांनी सुचवले की, सर्व सरकारी विभागांच्या रुग्णालयांचा, आरोग्य केंद्रांचा आणि अन्य आरोग्य सुविधांचा उपयोग सर्वांसाठी करायचा सरसकट आदेश केंद्र सरकारने काढला तर खूप फायदा होईल. त्यामुळे सध्या दुर्लक्षित असल्याने उपयोगात नसलेल्या सुविधांचा वापर होईल. सध्याच्या वापरातील आरोग्य सुविधांवरील कमालीचा ताण बराचसा कमी होऊ शकेल.

अ‍ॅड. वर्षा देशपांडे या गांधी समाजसेवक आहेत ज्या
राष्ट्रीय तपासणी व देखरेख समितीच्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सरकारच्या सदस्य आहेत. त्या राष्ट्रीय महिला वकीलांच्या पॅनलमधील सदस्य आहेत. कोरोना महामारीत त्या लेक लाडकी अभियान या स्वयंसेवी संस्थेमार्फत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करत आहे. तसेच या महामारीच्या काळात लोकांना बेड, आर्थिक सहाय्य आणि शासकीय योजनांद्वारे मदत करत आहेत.

Letter to Health Min-25-4-21


Tags: Adv.varsha deshpandehospitalअ‍ॅड. वर्षा देशपांडेकेंद्र सरकारकोरोनारुग्णालयं
Previous Post

फायर ऑडिट, अग्निशमन एनओसी नाही! तरीही कोरोना रुग्णालय!! विरारच्या रुग्णालय व्यवस्थापकांना अटक

Next Post

पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार

Next Post
Chandrakant Patil

पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!