मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या फसळत्या लाटेमुळे देशभर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या कठीण प्रसंगी लोकांचे प्राण वाचावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी सध्याच्या परिस्थितीवर एक ट्विट केले आहे. तेही असंच.
दिलीप कुमार सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतात. क्वचितच काही वेळा आपल्या मनातील भावना आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. दिलीप कुमार यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘सर्वांसाठी प्रार्थना करतो!’.
चाहतेही म्हणाले…दिलीपसाब काळजी घ्या!
- दिलीप कुमार यांच्या या ट्विटवर चाहते व्यक्त होताना दिसत आहेत. एकाने लिहिले की- “तुम्ही स्वतःची युसुफ साहेब आणि सायरा बानो जी यांची काळजी घ्या.”
- तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की “धन्यवाद दिलीपसाब, तुमचीही काळजी घ्या. ईश्वर तुम्हाला निरोगी ठेवो.”