मुक्तपीठ टीम
वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदासाठी ५० किंवा आवश्यकतेनुसार जागा, वैद्यकीय अधिकारी (बीएचएमस) या पदासाठी ५० किंवा आवश्यकतेनुसार जागा, एनएचएम (प्रसविका) या पदासाठी १०० किंवा आवश्यकतेनुसार जागा अशा एकूण २०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- बीएएमएस
२) पद क्र.२- बीएचएमएस
३) पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी आणि पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही तर, पद क्र.३ साठी ४० वर्षांपर्यंत वय असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: