मुक्तपीठ टीम
देशात कोरोना वाढत आहेत, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी सौम्य लक्षणे असलेले घरीच आयसोलेट होत आहेत घरीच उपचार घेत आहे. मात्र सध्याच्या काळात ऑक्सिजन हेच अमृत असणाऱ्या रुग्णाला त्याचा वापर नेमका कसा करावा याची माहितीच नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला या बद्दल सर्व माहिती देणार आहोत. सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशनमधील रुग्णांना स्वत:च्या शरीरातील ऑक्सिजन पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.
देशभरात लाखो कोरोना रूग्णांना घरीच होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे. औषधांद्वारेही ते बरे होत आहेत. कोणत्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचला तर रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जर त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात भरती करावे.
ऑक्सिमीटर नेमकं कसं काम करते ते समजून घेण्यासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील आरोग्य आणि उपयोगी बातम्या कॅटेगरी तपासा.
पल्स ऑक्सिमीटर कसं करते काम?
• ऑक्सिजनची पातळी योग्य आहे की नाही हे माहिती करुन घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे ऑक्सिमीटर आहे, ज्यास पल्स ऑक्सिमीटर देखील म्हणतात.
• पल्स ऑक्सिमीटर हे एक लहान डिव्हाइस आहे ज्याच्या चिमट्यासारख्या भागात हाताचे बोट ठेवले की ते रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजते.
• या डिव्हाइसद्वारे एखाद्यास अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत होते.
• पल्स ऑक्सिमीटर सुरू केल्यावर त्यात बोट ठेवल्यावर, त्वचेवर प्रकाश पडेल हे रक्त पेशींचा रंग आणि हालचाल शोधतो.
• ज्या पेशींमध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन असते ते चमकदार लाल दिसतात, तर बाकीचे गडद लाल दिसतात.
• चांगल्या ऑक्सिजन पातळी चांगली असणाऱ्याचे रक्त पेशी आणि इतर रक्त पेशींच्या प्रमाणानुसार ऑक्सिमीटर ऑक्सिजन सॅच्युरेशन टक्केवारी मोजते आणि दर्शवते.
• जर ऑक्सिमीटर ९६ टक्के रीडिंग दर्शवत असेल तर याचा अर्थ असा आहे की चार टक्के रक्त पेशींमध्ये ऑक्सिजन नाही.
• या डिव्हाइसद्वारे ऑक्सिजन प्रमाण कळण्यासाटी रुग्णाच्या रक्ताची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची आवश्यकता नसते.
रक्तातील ऑक्सिजनचे कोणते स्तर, काय सांगतात?
• निरोगी व्यक्तीच्या रक्तात ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ९५ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान असते.
• ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी पातळी दर्शविते की रुग्णाच्या फुफ्फुसांना त्रास होत आहे.
• त्याच वेळी, जर ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी जाण्यास सुरूवात झाली तर एखाद्याने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जर ही पातळी ९३ किंवा त्यापेक्षा कमी झाली तर रुग्णाला त्वरित रुग्णालयात नेले पाहिजे.
• कारण त्यातून असे सूचित होते की, रुग्णाच्या शरीरातील सात टक्के पेशी ऑक्सिजन वहन करु शकत नाहीत.
पाहा व्हिडीओ: