मुक्तपीठ टीम
लिक्विड ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी टाटा समूह २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करत आहे. टाटा समूह या कंटेनरच्या माध्यमातून देशात ऑक्सिजन पुरवणार आहे. यामुळे देशभरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होईल. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. टाटा समूहाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
Given the oxygen crisis, we are putting in all our efforts to support India’s healthcare infrastructure. #ThisIsTata pic.twitter.com/24xqxjZLO9
— Tata Group (@TataCompanies) April 20, 2021
टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार टाटा ग्रुप लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करीत आहे. यामुळे देशात ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होईल. ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी चार्टर्ड विमानाने क्रायोजेनिक कंटेनरची आयात करणे आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे.
PM @narendramodi‘s appeal to the people of India is laudatory and we at the Tata Group, are committed to doing as much as possible to strengthen the fight against #COVID19. To mitigate the oxygen crisis, here is one such effort to boost health Infrastructure.
— Tata Group (@TataCompanies) April 20, 2021
ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षी, कोरोना साथीच्या रोगाची पहिली लाट भारतावर आली तेव्हा या समुहाने दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीन यासारख्या देशातून मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर, पीपीई किट, मास्क आणि ग्लोव्हज आयात केले. या समुहाने कोरोना महामारीसाठी दीड हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतदेखील पुरविली.
पाहा व्हिडीओ: