मुक्तपीठ टीम
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फिजिशियन या पदासाठी १५ जागा, अनेस्थेशियन या पदासाठी ४ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ६४ जागा, आयुष वैद्यकीय अधिकारी या पदासाठी २ जागा, हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी १४ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी १२७ जागा, एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी ११ जागा, लॅब टेक्निशियन या पदासाठी १३ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी २० जागा, स्टोअर ऑफिसर या पदासाठी १५ जागा अशा एकूण २८५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी (मेडिसिन)
२) पद क्र.२- संबंधित पदवी/डिप्लोमा
३) पद क्र.३- एमबीबीएस
४) पद क्र.४- बीएएमएस/ बीयूएमएस
५) पद क्र.५- रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
६) पद क्र.६- जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग)
७) पद क्र.७- एक्स-रे टेक्निशियन कोर्स
८) पद क्र.८- १) बी.एससी २) डीएमएलटी
९) पद क्र.९- डी.फार्म/ बी. फार्म
१०) पद क्र.१०- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही.
अर्ज कसा करावा
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती पीडीएफ फॉरमेट मध्ये तयार करून lokmccovid19@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवा.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.kolhapurcorporation.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.