Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाड्यात पाऊस पावला, ऊस वाढला, अतिरिक्त ऊसाचा नवा प्रश्न उद्भवला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sugar factory

मुक्तपीठ टीम

मराठवाड्यात चांगला पाऊस पडल्याने जायकवाडी धरणात मुबलक पाणी साठा झाला. याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा जराही तुटवडा नसण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही झाला आहे. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली. त्याचे साइड इफेक्ट आता दिसत आहेत. जालन्याच्या घनसावंगी आणि अंबड या दोन तालुक्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चांगला पाऊस, अतिरिक्त ऊस!

  • पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा कल ऊसाकडे
  • पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे घनसावंगी आणि अंबड तालुक्यात ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखाना आणि याच कारखान्याचे क्रमांक दोनचे युनिट असलेल्या सागर सहकारी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • चालू हंगामात जवळपास २६ हजार हेक्टर ऊसाचे पूर्णपणे गाळप करावे लागणार आहे.
  • त्यामुळे ‘समर्थ’ आणि ‘सागर’ कारखान्याच्या व्यवस्थापनापुढील समस्या वाढल्या आहेत.
  • या दोन्ही कारखान्यांत दररोज सात-आठ हजार टन ऊस गाळप होत आहे.
  • १८ एप्रिलपर्यंत ‘समर्थ’ आणि ‘सागर’मध्ये ११ लाख ८४ हजार टन उसाचे गाळप झाले.
  • गेल्या ऑक्टोबरमध्ये गाळपाची सुरूवात करताना ‘समर्थ’मध्ये आठ लाख टन तर ‘सागर’मध्ये पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले गेले.
  • तरीही जवळपास आठ लाख टन उसाचा प्रश्न आहे.

अतिरिक्त ऊस तसाच राहणार नाही!

  • आठ लाख टन उसाचा प्रश्नपोटी इतर कारखान्यांत ऊस पाठविण्याचा निर्णय
  • त्यासाठी जालना जिल्ह्यातील अन्य एक सहकारी आणि दोन खासगी कारखान्यांसह औरंगाबाद, लातूर, जळगाव, बीड, सोलापूर, परभणी या जिल्ह्यांतील कारखान्यांमध्ये अतिरिक्त ऊस पाठविण्याचे ठरवण्यात आले.
  • त्यासाठी सहकारमंत्री आणि आयुक्तांसोबत कारखाना व्यवस्थापनाने चर्चा केली.
  • अतिरिक्त ऊस नेण्याचा करार झालेल्यांपैकी काही कारखाने नंतरच्या काळात त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने बंद झाले.
  • त्यामुळे आणखी काही कारखान्यांत ऊस पाठविण्याचा निर्णय झाला.
  • सर्वांचा ऊस गाळप व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न
  • कार्यक्षेत्रातील सर्वांचा ऊस संपल्याशिवाय समर्थ आणि सागर हे दोन्ही कारखाने बंद होणार नाहीत.
  • सर्वांचा ऊस गाळप व्हावा यासाठी सुरुवातीपासूनच शर्थीचे प्रयत्न करत आहेत, असे पालकमंत्री राजेश टोपे यांनीही सांगितले आहे.
  • दररोज आठ-दहा हजार टन ऊस बाहेरच्या कारखान्यांना जात आहे.
  • बाहेरच्या आठ कारखान्यांना समर्थने तोडणी व वाहतूक यंत्रणाही दिली आहे.
  • सभासदांचा ऊस घेण्यात येत असून बिगर सभासदांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस द्यावा.
  • बिगर सभासदांचा ऊसही शिल्लक राहणार नाही.

शेतकऱ्यांनी नवीन ऊस लावू नये असे आवाहन

  • पुढील हंगामासाठी समर्थ आणि सागर कारखान्यांची गाळप क्षमता दोन-अडीच हजार टनांनी वाढविण्यात येत आहे.
  • इथेनॉलचे दोन प्रकल्प उभे राहत आहेत.
  • सध्याचाच ऊस अधिक असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नवीन ऊस लावू नये.
  • पुढील हंगामात बाहेरच्या कारखान्यांकडेही मोठ्या प्रमाणावर ऊस असणार आहे.

Tags: jayakwadi damMarathwadasugar factorySugarcaneऊसजायकवाडी धरणमराठवाडासाखर कारखाने
Previous Post

कोरोना सावधगिरी…’हिरो’चे ८० हजार कर्मचारी असलेले गुजरातसह ६ प्लांट तात्पुरते बंद!

Next Post

कोरोना चाचणी करताय? लॅब तपासा…बनावट चाचण्यांचा जीवघेणा धंदा जोरात!

Next Post
corona report

कोरोना चाचणी करताय? लॅब तपासा...बनावट चाचण्यांचा जीवघेणा धंदा जोरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!