मुक्तपीठ टीम
कोरानाच्या या काळात अनेक नेत्यांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाली. ते बरे होऊनही परतले आहेत. याच नेत्यांच्या यादीत अजून एका नव्या नेत्याचा समावेश झाला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच केलेली चाचणी ही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “सौम्य लक्षणे आढळल्यानंतर माझी तपासणी झाली आणि मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.” राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांत संपर्कात असलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांनी कोरोना सुरक्षा नियमांचे अनुसरण करून सुरक्षित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. राहुल गांधींच्या आधी देशातील आणि महाराष्ट्रातीलही अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
कोरोनाचा फटका बसलेले काही नेते! यादी वाढतेच आहे…
1. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
2. गृहमंत्री अमित शहा
3. नितीन गडकरी
4. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
5. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव
6. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव
7. केंद्रीय मंत्री संजीव बलियान
8. कम्युनिस्ट नेते डी. राजा
9. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजय
10. द्रमुक खासदार कन्निमोळी
11. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा
12. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,
13. उपमुख्यमंत्री अजित पवार,
14. खासदार नारायण राणे
15. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
16. नगरविकास एकनाथ शिंदे
17. गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड
18. सामाजिक न्याय धंनजय मुंडे,
19. आऱोग्य राजेश टोपे
जेथे झाल्या निवडणुका, तेथे फोफोवला कोरोना
राहुल गांधींनी कोरोना संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. कोरोनाची लस देशातील सर्व लोकांना सरसकट दिली जावी, अशी मागणी अनेकदा केली आहे. सरकारला वेळेआधीच अनेक संभाव्य समस्यांबद्दलही राहुल गांधी यांनी सावध केले आहे. मात्र, अनेक वेळा भाजपाच्या नेत्यांकडून त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले, त्यांची टर उडवण्यात आली. केवळ दोन लसींवर अवलंबून न राहता भारताने आणखीही लसींकडे वळावे आणि लसीकरण वाढवावे, रही त्यांची मागणी आता भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या खूप आधीची आहे. पण त्यांनी मागणी केली तेव्हा ते एका लॉबीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे सनसनाटी आरोप करण्यात भाजपाचेच नेते पुढे होते.
बंगाल निवडणुकीच्या काळात तेथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागताच राहुल गांधी यांनी स्वत:च्या सर्व सभा रद्द केल्या.
वाचा: http://muktpeeth.com/will-modi-mamata-stop-campaign/