मुक्तपीठ टीम
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इलेक्ट्रिकल या पदासाठी २२ जागा, मेकॅनिकल या पदासाठी १४ जागा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन या पदासाठी १४ जागा अशा एकूण ५० जागांसाठी भरती आहे. ही फक्त महिलांसाठी विशेष भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ६ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ६५% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी [ एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी: ५५% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र) २) जीएटीई २०२१ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.ntpc.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: