मुक्तपीठ टीम
गेल्या आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये भारतातच नाही तर जगभरात कोरोना उफाळला होता. सर्वच अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसताना दिसला. भारतही अपवाद नव्हता. मात्र, त्याचवेळी भारतात सोन्याची आयात २२.५८ टक्क्यांनी वाढून ३४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २.५४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
देशाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात चांदीची आयात ७१ टक्क्यांनी घसरून ७९१ कोटी डॉलर्सवर आली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम चालू खात्यातील तूटी वर होतो.
सोन्याची आयात वाढ, चालू खात्यातील तुटीत वाढ
- देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढली
- परदेशी चलन देशात येते आणि येथून निघून जाते या दोन क्रियेतील अंतराला सीएडी(CAD) असे म्हणतात.
भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश-
- भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे.
- दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते.
- गेल्या आर्थिक वर्षात रत्ने व दागिन्यांची निर्यात २५.५ टक्क्यांनी घसरून २६ अब्ज डॉलरवर गेली.
- भारत दरवर्षी ८०० ते ९०० टन सोन्याची आयात करतो.
- अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे.
- यात ७.५ टक्के सीमा शुल्क आणि अडीच टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास कर आहे.