Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोलेंच्या आमदार निधीतून कोरोना विरोधातील लढाईसाठी ५० लाखांची मदत

April 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतो आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी अस्तित्वात असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे.

 

त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करण्याच्या सूचना भंडारा जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे भंडारा जिल्ह्याला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये बळ मिळणार आहे.

 

कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.


Tags: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेकोरोनामुक्तपीठ
Previous Post

कोरोनाची लस घेतली…किती काळ राहतो प्रभाव?

Next Post

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल की त्यांनीच केलेली दिशाभूल? भाजपाच्या केशव उपाध्ये यांचा सवाल

Next Post
keshav upadhye

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल की त्यांनीच केलेली दिशाभूल? भाजपाच्या केशव उपाध्ये यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!