मुक्तपीठ टीम
संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे, यासाठी सरकारने जनतेला लसीकरणाचे आवाहन केले आहे. देशात आतापर्यंत कोट्यावधी लोकांना लस दिली आहे तर अनेक लसीकरणासाठी रांगेत उभे आहेत. या लसींचा साईड इफेक्ट जरी असला तरी लसीकरणानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास त्या मदत करतात. आपला लाईफटाईम कोरोनापासून बचाव करत नाही तर काही काळ कोरोनाशी लढण्यास मदत करतात. आजकाल लोकांच्या मनात याबद्दल एकच प्रश्न आहे की या लसीचा फरक किती दिवस टिकतो?
का गरजेची आहे लस?
अलीकडेच काही शास्त्रज्ञांनी या विषयावर अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असा दावा केला आहे की लस घेणार्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढली आहे. तज्ञांच्या मते, ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर त्यांना संसर्गाचा धोका कमी आहे तसेच कोरोनाला लढा देण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणूनच, या लसींचे दोन डोस शरीरात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे.
लसीकरण आणि प्रतिकारशक्ती: संशोधन काय सांगतो?
अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने लसीकरणानंतर ४०० हून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करचा अभ्यास केला आहे. संशोधनात असे आढळले की फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना या लस ८० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत, दुसर्या डोसनंतर त्याचा परिणाम ९० टक्के होता. सीरमचे म्हणणे आहे की दोन ते तीन महिन्यांत कोव्हिशील्ड लस ९०% पर्यंत प्रभावी आहे.
लसीचा प्रभाव किती काळ टिकतो?
- फायझर-बायोटेक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासानुसार शास्त्रज्ञांना असे समजून आले की लोक सहा महिन्यांपर्यंत व्हायरसपासून बचाव करू शकतात.
- काही लसींचा परिणाम सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत राहील असा विश्वास आहे.
- कोरोना पासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण १००% प्रभावी असल्याचे सीडीसीने सांगितले आहे.
- तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकन प्रकारांविरूद्धही अनेक लस प्रभावी आहेत.