Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!

April 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Atalbihari Vajpayee narednra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीतील काळा अध्याय आणि वेगळं वळण देणारी घटना म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाची गुजरातमधील २००२ची दंगल. त्या दंगलीची हाताळणी करताना राज्यातील तत्कालिन मोदी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप झाला. मोठ्या संख्येने सर्वसामान्यांचे बळी गेल्याने जगभर नाचक्की झाली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म सांगितला. प्रजेत भेदभाव करु नये असा संदेश दिला.

तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. ते गुजरात दौऱ्यावर गेले. त्यांचा चेहरा तो संवेदनशील नेता व्यथित असल्याचे सांगत होता. पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही होते. एका पत्रकाराने विचारले, तुम्ही मुख्यमंत्री मोदींना काही संदेश देणार का?

या प्रश्नाचे उत्तर भाषाप्रभू वाजपेयींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत दिले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना माझा एकच संदेश आहे, त्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे…राजधर्म…हा शब्द बर्‍यापैकी अर्थपूर्ण आहे. मी त्याचं पालन करीत आहे. पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजासाठी, राज्यकर्त्यांसाठी, प्रजेमध्ये फरक असू शकत नाही. ना जन्माच्या आधारे, ना जातीच्या आधारे, ना संप्रदायाच्या आधारे.”

वाजपेयी जेव्हा राजधर्माचा संदेश देत होते, तेव्हा नरेंद्र मोदीही त्यांच्या शेजारी बसले होते. मध्यभागी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘साहेब आम्हीही तेच करीत आहोत.’ त्यानंतर वाजपेयीजी पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी तसेच करत आहेत असा माझा विश्वास आहे.’

वाजपेयींनी का सांगितला होता राजधर्म?

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये भजकलेल्या दंगलीत हजारोंचे बळी गेले. त्यात राज्य सरकारची यंत्रणा पक्षपाती वागत असल्याचे आरोप झाले. दंगलीत बळी गेलेल्यांमध्ये मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप झाले. गुजरातमधील तत्कालिन मोदी सरकार भेदभाव करीत आहे असे आरोप झाले, त्यामुळे व्यथित झालेल्या संवेदनशील स्वभावाच्या पंतप्रधान वाजपेयींनी मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळण्याचा संदेश दिला, असे मानले जाते.

 

ही घटना आज का आठवली? कारण समजून घेण्यासाठी ही आजची बातमी वाचा:

सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!

सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!


Tags: atal bihari vajpayeegujrat riotNarendra modirajdharmaअटलबिहारी वाजपेयीगुजरात दंगलनरेंद्र मोदीराजधर्म
Previous Post

सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!

Next Post

बॉलिवूडमध्येही कोरोना लाट…सेलिब्रिटींचं कळतं, कामगारांवरही संकट!

Next Post
celebrities

बॉलिवूडमध्येही कोरोना लाट...सेलिब्रिटींचं कळतं, कामगारांवरही संकट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!