मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची दुसरी लाट उफाळली असतानाच महाराष्ट्रात त्याचा प्रकोप सर्वात जास्त जाणवतो आहे. दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार तयार करण्यात आलेल्या शहरांच्या यादीत नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. पुढील तीन क्रमांक नागपूर, पुणे, मुंबई यांचे आहेत.
कोरोनाच्या दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नाशिकमध्ये ४६ हजार ५०, नागपुरात ४५ हजार ८५६, पुण्यात ३६ हजार ३५९, मुंबईत १७ हजार ९४६ रुग्ण आहेत. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट उसळू लागलेल्या लखनौत हेच प्रमाण ११ हजार ९८७ रुग्ण आहेत. तर दिल्लीत दहा लाखांमागे ६ हजार ८०० आहे.
नाशिक का कोरोना टॉपर?
- पहिल्या लाटेनंतर अनलॉक सुरु होताच नाशिककर निष्काळजी झाले.
- मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.
- कोरोना रुग्ण वाढत असतानाही गर्दीवर नियंत्रण नव्हते
- गर्दी नियंत्रणासाठी अवलंबलेला बाजार प्रवेश तिकीटाचा प्रयोगच गर्दी जमवणारा ठरला
- रंगपंचमीसारख्या उत्सवांमध्ये बेबंद गर्दीतूनही कोरोना पसरला
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने झाले नाही, त्यामुळे रंगपंचमीची गर्दी, बाजारातील गर्दी, धार्मिक स्थळांवरील गर्दीत कोरोना पॉझिटिव्ह सहभागी झाले.
दहा लाख लोकसंख्येनुसार नव्या कोरोना रुग्णसंख्येची शहरे
- नाशिक
- नागपूर
- पुणे
- मुंबई
- लखनौ
- बेंगळुरू
- भोपाळ
- इंदूर
- दिल्ली
- पाटणा