मुक्तपीठ टीम
देशात सर्वत्रच कोरोनाची दुसरी लाट उफाळली असतानाच उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात गर्दी उसळली आहे. तेथे देशभरातून लाखो श्रद्धाळू आले आहेत. कुंभमेळ्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने येणाऱ्या काळात देशभर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली. त्यानुसार महामंडलेश्वरांनी त्वरित प्रतिसाद देत श्रद्धाळूंना स्नानासाठी मोठ्या संख्येने न येण्याचे आणि कोरोना नियमांच्या पालनाचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्विट करून महामंडलेश्वरांना केलेल्या विनंतीची माहिती दिली.
पंतप्रधानांचे ट्विट:
- आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवर बोललो.
- सर्व संतांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली.
- सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत.
- त्याबद्दल मी संतांना धन्यवाद दिले.
- मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा.
- यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीला महामंडलेश्वरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या ट्विटनंतर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही ट्विट केले आहे.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
स्वामी अवधेशानंद गिरींचे आवाहन
- पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो.
- जीवनाची रक्षा करणं मोठं पुण्य आहे. माझा धर्मपरायण जनतेला आग्रह आहे की, कोरोना परिस्थितीमुळे मोठ्या संख्येनं स्नानासाठी येऊ नये.
- नियमांचं पालन करावं.
माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान का हम सम्मान करते हैं ! जीवन की रक्षा महत पुण्य है।मेरा धर्म परायण जनता से आग्रह है कि कोविड की परिस्थितियों को देखते हुए भारी संख्या में स्नान के लिए न आएँ एवं नियमों का निर्वहन करें ! @narendramodi @AmitShah @TIRATHSRAWAT #KumbhMela2021 #कुम्भ https://t.co/dNjPPnDztQ
— Swami Avdheshanand (@AvdheshanandG) April 17, 2021
कुंभमेळ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग
- निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचे कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोरोनाने निधन झाले.
- नंतर निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हरिद्वारच्या त्यांच्या सोबत असलेल्या अनेक साधू आणि श्रद्धाळूंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी कुंभमेळा आजपासून (१७ एप्रिल) संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
- कुंभमेळा सुरु झाल्यानंतर उत्तराखंड राज्यात कोरोनाचा संसर्ग वेग ८८१४ टक्क्यांनी वाढला.
- १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी – १७२ कोरोना रुग्ण
- १ ते १५ एप्रिल १५ हजार ३३३
- फेब्रुवारीत रोजचे रुग्ण – ३० ते ६०
- सध्या रोजचे रुग्ण – २ हजार ते २५००