मुक्तपीठ टीम
रिअलमी कंपनी भारतीय बाजारात अत्यंत लोकप्रिय बनत चालली आहे. तिने भारतीय बाजारात आपले एक उत्कृष्ट स्थान मिळवले आहे. २०२०च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये कंपनीचे मार्केट शेअर १५ टक्क्यांपेक्षाही जास्त होते. तसेच टॉप कंपन्यांमध्ये रिअलमी कंपनीने ४ स्थान मिळवले आहे. अशातच कंपनी आपल्या ५ जी स्मार्टफोनच्या विक्रीवर कंपनीचे शेअर वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे. कंपनी एप्रिल २२ रोजी आपला रियल मी ८ ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे.फ्लिपकार्टने याचा टीजर जारी केला आहे.
‘रिअलमी ८ ५जी’ स्मार्टफोनमध्ये मीडिया टेकचा नवा डायमेंसिटी ७०० ५ जी चीपसेटचा वापर केला जाईल. कंपनीने हा विशेषतः भारतीय बाजारासाठी डिझाईन केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ही अगदी कमी आहे. म्हणजेच, ‘रिअलमी ८ ५जी’ स्मार्टफोनची किंमत २०,००० पेक्षा ही कमी असेल.
रियलमी ८ ५जी चे स्पेसिफिकेशन
- गेल्या आठवड्यात कंपनीने थायलंडमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला होता.आणि या पोस्टमध्ये रिअलमी ८ ५जी ला २१एप्रिल ही लॉन्च करण्याची तारीख दिली होती.
- तसेच कंपनीच्या दाव्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअल कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- सोबतच यामध्ये ८ जीबी रॅम आणि अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट मिळेल.
- कंपनी आपला रिअलमी यु आय २.० इंटरफेस ही देईल.
- तसेच यामध्ये ५००० एमएएच ची बॅटरी मिळेल.
- मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ५ जी चे विशेष फीचर्स
- हा प्रोसेसर ९० एचझेड डिस्प्लेचा सपोर्ट करतो.
- हा हाय रेजोल्यूशन फुल एच डी + डिस्प्ले आणि अल्ट्रा-फास्ट रिफ्रेशन रेटला सपोर्ट करतो.
- यामुळे स्क्रॉलिंग आणि गेमिंगच्या दरम्यान युजर्सना एक उत्कृष्ट अनुभव मिळेल.
- हा ६४ मेगापिक्सल असणाऱ्या मल्टी कॅमेराला सपोर्ट करतो.
- मीडियाटेकचे म्हणणे आहे कि या फोनची बॅटरी लाइफ इम्प्रोवे करेल.
- हा मल्टी वॉइस असिस्टेंटला ही सपोर्ट करतो.
भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन
रिअलमी X७ ५जी ची किंमत १९,९९९ रुपये आहे.
मोटो जी ५ जीची २०,९९९ रुपये आहे.
एमआय १० आय ५ जीची किंमत २१,९९९ रुपये एवढी आहे.
ओप्पो एफ १९ प्रो+ ५ जीची किंमत २४,७९० रुपये आहे.
रिअलमी X७ ५जी:
मीडियाटेक डायमेंनसिटी ८०० यू प्रोसेर, ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ६४ एम पी क्वाड कॅमेरा
मोटो जी ५ जी
क्वालकॉम स्नैपड्रैगन ७५० जी प्रोसेसर, ६ जीबी रॅम,१२८ जीबी स्टोरेज, ४८ एमपी क्वाड कॅमरा
एमआय १० आय ५ जी
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर, ६ जीबी रॅम,१२८ जीबी स्टोरेज, १०८ एमपी क्वाड कॅमरा
ओप्पो एफ १९ प्रो + ५ जी
मीडियाटेक डायमेंनसिटी 800U प्रोसेर, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ४८ एमपी क्वाड कॅमरा