मुक्तपीठ टीम
‘शिवाय’ या गाजलेल्या चित्रपटात छोट्या मुलीसाठी लढणारा अजय देवगण आता प्रत्यक्ष जीवनातही एका छोट्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे. अजयने दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या एका चिमुकल्या मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्याच्या फॅन्सना केले आहे. त्या मुलाच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
अजय – द रिअल हिरो
- अजयने केलेले ट्विट हे अयांश गुप्ता या मुलाच्या मदतीसाठी आहे.
- स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने या मुलाला ग्रासले आहे.
- त्या मुलाच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
- अजय देवगण यांनी ट्विटद्वारे लोकांना मुलाच्या उपचारात मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अजय देवगणचे ट्विट: “#SaveAyaanshGupta हा चिमुकला पाठीच्या स्नायूंच्या अॅट्रॉफीने ग्रस्त आहे आणि जगातील सर्वात महागड्या औषधाची त्याला आवश्यकता आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची गरज आहे. आपण त्याला देणगीद्वारे मदत करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मी यासाठी देणगी लिंक शेअर करत आहे.”
#SaveAyaanshGupta, he has been suffering from Spinal Muscular Atrophy & needs the world’s most expensive drug. His treatment would cost around ₹16,00,00,000. Your donation can help them🙏🏼
Sharing donation links in the comments.— Ajay Devgn (@ajaydevgn) April 14, 2021
याआधीही अजय देवगणने अशाच प्रकारे अन्य गरजूंसाठीही मदतीचे आवाहन केले होते. त्याला लोकांचा प्रतिसादही लाभला. आताही त्याच्या चाहत्यांसह अन्य ट्विटरकरांनीही अजय देवगणला मदतीचे आश्वासन दिले आहे.