Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२० वर्षांचं महागडं युद्ध संपणार…तर भारतासाठी का अडचण?

April 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
army

मुक्तपीठ टीम

अफगाणिस्तानच्या भूमीवरील तालिबानविरुद्धचे अमेरिकेचे गेले २० वर्ष सुरु असलेले थेट युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेने तेथून आपले सैन्य मायदेशी बोलवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने सैनिक हटवल्यानंतर पाकिस्तान समर्थित तालिबानी पुन्हा वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सरकार आणि भारतासाठी अमेरिकेचा निर्णय अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या जिव्हारी लागलेल्या ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००१ मध्ये अमेरिकेने आपले सैन्य तालिबानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठविले होते. तेव्हापासून ते अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानात तैनात असलेल्या २५०० अमेरिकन सैन्याला परतीचा आदेश दिला आहे.

अफगाणिस्तानात ७ हजाराहून अधिक अमेरिकन सैनिक

  • सध्या अफगाणिस्तानात ७ हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत.
  • त्यातील बहुतेक जण नाटोचा भाग म्हणून तेथे आहेत.
  • तालिबानने सातत्याने अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केले आहे.
  • गेले काही दिवस तालिबानने पुन्हा एकदा अफगाणी सैन्यावरही हल्ले वाढवले आहेत.

अमेरिकेनेही तयार केला होता हा प्रस्ताव

  • यापूर्वी अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानातून परतण्यासाठी १ मे ची मुदत ठरवली होती.
  • अमेरिकेला तालिबानशी शांतता करार हवा होता.
  • त्यासाठी अमेरिका तालिबानचा सहभाग असणारी नवी सरकारी यंत्रणा तयार करण्याच्या प्रयत्नात होती.
  • मात्र अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी तशा सत्ता सहभागास स्पष्ट नकार दिला.

जगातील महागडे लांबलेले युद्ध

  • अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात लढलेले युद्ध हे जगातील लांबलेले आणि महागडे युद्ध मानले जाते.
  • २० वर्षे चाललेल्या या युद्धात अमेरिकेने २४०० सैनिकांना गमावले.
  • अमेरिकेने परकीय भूमीवरील या युद्धासाठी १५० लाख कोटी रुपयांचा खर्च केला.
  • या युद्धाद्वारे अमेरिकेला तालिबानला संपवायचे होते, पण ते आजवर शक्य झाले नाही.
  • आताही अनेक अमेरिकन लोकप्रतिनिधींचा अफगाणिस्तानातून सैन्य माघारीस विरोध आहे. तरीही जो बायडन यांनी आग्रहपूर्वक सैन्य माघारीचा निर्णय घेतला आहे.

भारतासाठी अडचणीचा निर्णय

  • अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याच्या तैनातीमुळे तालिबानवर वचक आहे.
  • अमेरिकेच्या माघारीनंतर पाकिस्तान तालिबानची मदत वाढवेल.
  • भारत अफगाणिस्तानमध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम करत आहे.
  • त्या प्रकल्पांच्या कामांमध्ये तालिबान अडचणी आणत असतात, आता तसे हल्ले, कुरापती वाढतील.
  • तालिबान शक्तिशाली होणे भारताला काश्मिरातील परिस्थितीसाठीही चांगले नाही.

Tags: अफगाणिस्तानअमेरिकाजो बायडेनतालिबानभारत
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत १४९ विविध जागांसाठी भरती

Next Post

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट…

Next Post
jwala

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!