मुक्तपीठ टीम
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. ज्वाला गुट्टाने तिच्या इंस्टाग्रामवरून २२ एप्रिल २०२१ ला अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
View this post on Instagram
हे दोघे या महिन्याच्या २२ एप्रिलला विवाह बंधनात अडणार आहेत. ज्वाला आणि विष्णूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाची निमंत्रण पत्रिका शेअर करत लग्न करत असल्याची घोषणा केली.
View this post on Instagram
अशी रंगली लव्ह स्टोरी…
- ज्वाला आणि विष्णू काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
- दोन वर्षांपूर्वी या दोघानीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे प्रेमात असल्याचे जाहीर केले.
- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विष्णू विशाल आणि ज्वालाने साखरपुडा केला होता.
View this post on Instagram
दोघांचेही दुसरे लग्न
- ज्वाला आणि विष्णू पहिल्यांदाच विवाहबंधनात अडकणार नसून हे त्यांचे दुसरे लग्न असणार आहे.
- याआधी ज्वालाने २००५ मध्ये चार वेळा नॅशनल चॅम्पियन असलेल्या चेतन आनंदशी लग्न केले होते.
- ते लग्न फारकाळ टिकू शकले नाही.
- २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
- विष्णूचे याआधी अभिनेत्री रजनी नटराजशी लग्न झाले होते.
View this post on Instagram
ज्वालाची बॅडमिंटन इनिंग…
- सध्या ज्वाला गुट्टा बॅडमिंटन अॅकॅडमी चालवित आहे.
- ज्वालाने अनेक स्पर्धेत पदके जिंकली आहेत.
- २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ज्वालाने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते.
View this post on Instagram
विष्णू विशाल…क्रिकेटर ते अभिनेता!
- विष्णू विशालने एमबीए केले आहे.
- विष्णूला दक्षिणेतील फिल्ड इंडस्ट्रीचा सुपरस्टार म्हटले जाते.
- विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता.
- त्यावेळी तो रमेश कुडावला म्हणून परिचित होता.
- पायाच्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेट सोडले होते.
- यानंतर विष्णू या नावाने त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
- आज तो एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.
View this post on Instagram