मुक्तपीठ टीम
ऐकताना मजेशीर वाटते, मात्र वाळवंटातील देश दुबईला आता अर्ध्यापेक्षा जास्त भाग हिरवागार करायचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुबई अर्बन मास्टर प्लॅन २०४० नुसार, वाळवंटातील दुबईचा ६०% भाग हिरवागार करायची सरकारची योजना आहे. दुबई हे राहण्यासाठी व कामासाठी जगातील सर्वात सुंदर शहर करायच्या उद्देशाने एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. राजे शेख मोहंमद बिन राशिद अल मकतूम, पंतप्रधान व दुबईच्या प्रशासकांनी हा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे.
२००८ पर्यंत दुबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८ टक्के भागातही हिरवळ नव्हती. परंतु २०२० पर्यंत शहरी भागाचा ३५% भागांवर हिरवळ दिसू लागली. पण हा शहरी भाग दुबईच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ २०% आहे. आता ६० टक्के भागा हिरवागार करण्याच्या योजनेत दुबईतील शहरी भाग वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे.
यासाठी संसाधनांचा अधिकाधिक उपयोग हा निरोगी आणि सर्वसमावेशक समुदाय विकासासाठी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हिरवळ, विश्रांतीच्या जागा आणि सार्वजनिक उद्याने दुप्पट केली जातील. २०४०पर्यंत दुबईची लोकसंख्या वाढून ५८ लाख होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन हिरवळ वाढविण्याची योजना आहे.
- अमीरातच्या एकूण क्षेत्रापैकी ६०% निसर्ग आणि ग्रामीण नैसर्गिक क्षेत्रांचा वाटा असेल.
- निवासी भाग व कार्यस्थळांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जातील, जे पादचारी आणि सायकल चालकांसाठी सोयीचे असतील.
- हॉटेल आणि पर्यटनासाठीच्या भूभागात १३४% वाढ होईल.
- शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठीच्या भूभागात २५% वाढ होईल, तर सार्वजनिक समुद्रकिनार्यांची लांबी ४००% पर्यंत वाढेल.
पाहा व्हिडीओ: