मुक्तपीठ टीम
असे म्हणतात की जिथे इच्छा असते तिथे कोणताना कोणता मार्ग हा नेहमीच तयार असतो. म्हणजेच, जर मनात इच्छाशक्ती बळकट असेल तर आयुष्यातील अडचणींवर मात करत आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. सध्या व्हायरल झालेल्या एटीएम शिपायाचे परिश्रमह सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेच आहेत.
सध्या एका एटीएम शिपायाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे छायाचित्र आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. हे छायाचित्र खास ठरले आहे, कारण हा तरुण शिपाई एटीएमच्या आत हा जमिनीवर बसून अभ्यास करत आहे.
त्यातून त्याची अभ्यासासाठीची ओढ दिसून येते. त्याचे हे छायाचित्र ट्वीट करून अवनिश शरण यांनी दुष्यंत कुमार यांच्या कवितेची ओळ लिहिली आहे… “हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए.” हजारो लोकांना हे ट्विट आवडले असून त्यावर सतत कमेंट्स मिळत आहेत. बरेच लोक असे म्हणत आहेत की, ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे ते परिस्थितीची कारणे देत नाहीत. तर मेहनत करतात. बरेच लोक या शिपायाचे कौतुक करतानाच त्याच्या मदतीसाठी त्याचा पत्ता विचारत आहेत.
आपल्याही माहितीत असे कुणी प्रतिभावान मेहनती असतील तर मुक्तपीठला नक्की कळवा.
पाहा व्हिडीओ: