भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही दुर्घटना घडताच मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच घटनेचा आघावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या नातेवाईकांन ५ लाखाची मदत जाहीर केली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशू केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारातील दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर राज्य सरकारने जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहनही केलं आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मी करतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
The unfortunate incident of fire at Bhandara District General Hospital in Maharashtra is extremely tragic.
My condolences to the families of the children who lost their lives.
I appeal to Maha Govt to provide every possible assistance to the families of the injured & deceased.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 9, 2021
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. भंडारातील दुर्घटना ही हृदय पळवटून टाकणारी घटना आहे. या घटनेत अनमोल तरुणांचे जीव गमावले आहेत. सर्व शोकग्रस्त कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. लवकरात लवकर घटनेत जखमी झालेले सर्व बरे व्हावेत अशी आशा ही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
Heart-wrenching tragedy in Bhandara, Maharashtra, where we have lost precious young lives. My thoughts are with all the bereaved families. I hope the injured recover as early as possible.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करू हळहळ व्यक्त केली आहे. तसेच “या घटनेचा योग्य तपास केला गेला पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई करावी”, असे म्हणत क्रोध व्यक्त केला.
Fire incident at the Bhandara District Hospital,where about 10 children lost lives is very painful & disturbing.
My deep condolences to the families who suffered such irreparable loss.
This incident should be properly investigated & strict action be taken against the culprits.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केली हळहळ व्यक्त.
The fire accident in Bhandara district hospital, Maharashtra is very unfortunate. I am pained beyond words. My thoughts and condolences are with bereaved families. May God give them the strength to bear this irreparable loss.
— Amit Shah (@AmitShah) January 9, 2021