मुक्तपीठ टीम
“कोरोना हा रोगच नाही. तो गांडू प्रवृत्तीच्या लोकांना होतो. तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे जी माणस मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत. तसेच लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनर्त्यांना कवडीची अक्कल नाही”, अस वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान प्रमुख भिडे यांनी केले आहे. सांगली येथे लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोर्च्याच्यावेळी भिडे बोलत होते.
भिडे काय नवे बडबडले?
• समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे, मात्र शासन हे दुशासन होता कामा नये.
• निव्वळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत.
• संसार आणि व्यापारी माती मोल झाले.
• लोकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनर्त्याना कवडीमोल अकल नाही.
• लॉकडाऊन मध्ये खासदार आमदार यांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत.
• सामान्य माणसे उपासमार सुरू आहे. लोकांनी बंड करून उठले पाहिजे.
• सामान्य माणसांच्या विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत.
• असलं सरकार फेकून दिल पाहिजेल.
• दारू दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठया मारतात.
संभाजी भिडेंचा मास्कविरोध नेहमीचाच!
• त्यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता.
• शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं होतं.
• सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला.
• यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले होते.