मुक्तपीठ टीम
ठाण्याच्या कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ या संघटनेने कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असे नामकरण करण्याची विनंती केली आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीतील दिवंगत नेते मधु दंडवतेंचं योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव देणं आवश्यक असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या मागणी पत्रात म्हटलं आहे.
कोकण रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेतील एक महत्वाचा फायदेशीर मार्ग आहे. कोकण मार्ग रोहा रेल्वे स्थानक ते पेरणे रेल्वे स्थानक या पट्ट्यात आहे. या रेल्वेच्या उभारणीसाठी मधु दंडवते यांनी खूप प्रयत्न केले होते. रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांचे कोकण रेल्वेसाठी मोठे योगदान होते.
कोकण रेल्वे मार्गाचे जनक सर्वेसर्वा मधू दंडवते यांच्यामुळे हा मार्ग देशात नावारुपास आला आहे. तसेच या रेल्वे मार्गामुळे कोकणातील अनेक उद्योग, धंदे, व्यवसाय, शेती, शिक्षण या व्यवसायांना चालना मिळाली आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे मार्गाला मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याची मागणी केली आहे.