मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहेत. महाराष्ट्रात सध्या रोज साडेचार लाख लोकांचे लसीकरण सुरु आहे. मात्र, लसींचा तुडवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्रांहून लोक परत जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लसींचा पुरेसा पुरवठा केला जावा. तसेच महाराष्ट्रात को-व्हॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीची जास्त मागणी असल्याने ती लस जास्त पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
देशभरातील राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीसीद्वारे चर्चा केली. या चर्चेत राजेश टोपे यांनी १५ मिनिटे महाराष्ट्राची कोरोनाविरोधी उपाययोजना आणि लसीकरणाची माहिती दिली. महाराष्ट्रात थ्री टीची कडक अंलबजावणी होत असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. देशात इतर कुठच्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातच सर्वात कडकरीत्या होत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच त्यामुळे व्यापारी नाराज होत आहेत. तरीही कोरोना फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठेही तडजोड करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून शेजारच्या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सूचना करण्यासही त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितले.
रेनदेसिवीर या इंजेक्शनचा वापर खासगी डॉक्टरांनी ठरवलेल्या प्रक्रियेनुसारच करावा. तसंच ते इंजेक्शन अकराशे रुपयांपेक्षा जास्त असू नये, असेही ते म्हणाले. यापुढील काळातही बाराशे ते चौदाशेपर्यंत कमला किंमत ठरवून तसे आदेश काढले जाणार आहेत. त्याचे उल्लंघन झाले तर कडक कारवाई करण्यात येईल.