मुक्तपीठ टीम
सरन्यायाधीश शरद बोबडे येत्या २३ एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती रमणा यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीशांकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. या शिफारशीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीशपदासाठी एन. व्ही. रमणा यांच्या नियुक्तीला मान्यात दिली आहे. ते भारताचे ४८वे सरन्यायधीश असतील.
न्यायमूर्ती रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ते सरन्यायाधीश बनणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केले होते गंभीर आरोप
• आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सरन्यायाधीश बोबड्यांकडे एनव्ही रमणा यांची तक्रार केली होती.
• माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू यांच्यासह न्या. रमणा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली होती.
• गृहविभागाच्या चौकशीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली होती.
न्यायाधीश रमणा…शेतकरी कुटंबातून सरन्यायाधीशपदी!
• २७ ऑगस्ट १९५७ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती रमणा सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ आहेत.
• आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात ते मोठे झाले आहेत.
• १० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी वकील म्हणून नाव नोंदणी करुन आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सराव सुरू केला होता.
• त्यानंतर २७ जून २००० रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा कायम स्वरुपाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
• २ सप्टेंबर २०१३ रोजी, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश करण्यात आले
• १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.