Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

April 4, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
Stand Up India Scheme -2

मुक्तपीठ टीम

अनुसूचित जाती, जमाती आणि महिला वर्गातील अशा विकासोत्सुक उद्योजकांमध्ये ऊर्जा आणि उमेद तर काठोकाठ भरलेली असते, मात्र तरीही त्यांची स्वप्ने पूर्ण होण्याच्या मार्गात अनेक अडथळे असतात, आव्हाने असतात. ही आव्हाने लक्षात घेऊनच, केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरु केली.  ही योजना सुरू झाल्यापासून 23 मार्च 2021 पर्यंत स्टँड अप इंडीया अंतर्गत 1,14,322 पेक्षा जास्त खात्यांसाठी 25,586 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तळागाळातील समाजापर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेला वर्ष 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आज या योजनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेची वैशिष्ट्ये आणि आजवरच्या यशाचा धांडोळा घेण्याचा हा एक प्रयत्न:

Stand Up India Scheme 3

 

स्टँड अप इंडिया योजनेचे मुख्य उद्दिष्ट, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अशा समाजातल्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यासाठी, उद्योग करण्यास तयार आणि प्रशिक्षणार्थी अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना कर्ज देऊन त्यांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योगक्षेत्रात ग्रीन फिल्ड कंपन्या सुरु करण्यासाठी मदत करण्याचे काम या योजनेद्वारे केले जाते.

PM narendra modi stand up india
 

स्टँड अप इंडिया योजनेचा उद्देश आहे :

  • अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती  आणि महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.
  • उद्योग करण्यास तयार आणि प्रशिक्षणार्थी अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना कर्ज देऊन त्यांना उत्पादन, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योगक्षेत्रात ग्रीन फिल्ड कंपन्या सुरु करण्यासाठी मदत करणे.
  •  या योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमातीच्या किंवा महिला अशा किमान एका कर्जदाराला शेड्युल्ड व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून ग्रीन फिल्ड उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज सुविधा प्रदान करणे.

 

स्टँड अप इंडीया का ?

अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांना तसेच महिला उद्योजकांना आपला उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात, त्यासाठी कर्जे घेण्यात आणि इतर सहाय्य मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी व आव्हाने लक्षात घेऊन, त्यावर उपाय म्हणून, स्टँड अप इंडीया  योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळेच, या योजनेद्वारे एक अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, ज्यातून या घटकांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि तो पुढे सुरु ठेवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि प्रोत्साहनपर  वातावरण मिळू शकेल. या योजनेच्या आधारे बँकेच्या शाखांमधून कर्जदारांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळू शकेल.

 

या योजनेअंतर्गत, शेड्युल्ड व्यावसायिक बँकेच्या मार्फत तीन मार्गांनी कर्ज मिळवता येऊ शकेल.

• थेट बँकेच्या शाखेतून,

• स्टँड अप इंडीया पोर्टल च्या माध्यमातून (www.standupmitra.in)

•  लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) च्या मार्फत.

 

या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकेल ?

  • 18 वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती  किंवा महिला.
  • केवळ  ग्रीन फिल्ड प्रकल्प सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध.
  • सामूहिक उद्योग किंवा कंपनी असल्यास, त्यातील किमान 51 टक्के नियंत्रित मालकी हिस्सा अनुसूचित जाती -जमातीच्या व्यक्ती किंवा महिलांचा असायला हवा.
  •  कर्जदारांनी इतर कोणत्याही बँकेचे अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बुडवलेले नको.

23/03/2021 पर्यंतची योजनेची उपलब्धी

  • ही योजना सुरू झाल्यापासून 23 मार्च 2021 पर्यंत स्टँड अप इंडीया अंतर्गत 1,14,322 पेक्षा जास्त खात्यांसाठी 25,586 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • 23/03/2021 पर्यंत या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमाती आणि महिला खातेदारांची तसेच त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची सविस्तर माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
रक्कम कोटींमध्ये
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला एकूण
खात्यांची संख्या मंजूर रक्कम खात्यांची संख्या मंजूर रक्कम खात्यांची संख्या मंजूर रक्कम खात्यांची संख्या मंजूर रक्कम
16258 3335.87 4970 1049.72 93094 21200.77 114322 25586.37

 

 

 

 

 

 

 


Tags: Narendra modistand up indiaनरेंद्र मोदीस्टँड अप इंडिया
Previous Post

क्रिकेटनं पसरवला कोरोना…रोड सेफ्टी वर्ल्ड सेरीजनंतर छत्तीसगडमध्ये संसर्ग वाढला!

Next Post

कोरोना घरीच विलगीकरण…वाचा हे नवे नियम!

Next Post
home quarantine

कोरोना घरीच विलगीकरण...वाचा हे नवे नियम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!