मुक्तपीठ टीम
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अगौडा किल्ल्यातल्या तुरूंगाबद्दल सांगताना गोव्याच्या पर्यटन विभागाने केलेल्या प्रतापावर टीकेची झोड उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमणकर्ते असा करण्यात आला. पर्यटन विभागाने केलेल्या ट्विटवर नेटीजन्सनी संताप व्यक्त केला आहे. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही यावरुन भाजपा सरकारला फटकारल्यानंतर पर्यटन विभागाने ट्विट डिलीट केलंय तसंच माफीही मागितली आहे.
पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमणकर्ते असा केला. यावरुन विरोधकांनी भाजपा सरकारला फैलावर घेतलं आहे.
Strongly condemn the act of @BJP4Goa Government under @goacm @DrPramodPSawant of insulting the brave Maratha Warriors. This is real face of @BJP4India of undermining the true History of India. @INCGoa is proud of Chatrapati Shivaji Maharaj & his immense contribution to Goa. pic.twitter.com/oq0MPKOZ4P
— Girish Chodankar (@girishgoa) April 2, 2021
ट्विटमध्ये असं म्हटलंय,
अगौडा तुरुंग अप्रतिम अगौडा किल्ल्याच्याच भाग आहे. हा किल्ला १६६२ मध्ये निर्माण करण्यात आला होता. डच आणि मराठा आक्रमकांच्या विरोधात पोर्तुगीजांचं संरक्षण करणारा हा किल्ला आहे. हा दोन भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे.
डच आक्रमकांबरोबर मावळ्यांचाही आक्रमक असा उल्लेख केल्यानंतर टीका सुरू झाली. काँग्रेस नेत्यांनी भाजपला फैलावर घेतलं आहे. दिगंबर कामत यांनी ट्वीट केलंय. ते म्हणतात, ‘गोव्यातील बेजबाबदार सरकारने महान योद्ध्यांचा उल्लेख आक्रमक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा शूरांचा अपमान केला आहे. हा मोदींचा आधुनिक इतिहास आहे का?,”
टीका सुरु झाल्यावर पर्यटन विभागाकडून सारवासारव
पर्यटन विभागाचं ट्विट खालीलप्रमाणे
“अगौडा किल्ल्यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये डच सैन्यासाठी आक्रमक शब्द वापरण्यात आला होता. डच आक्रमक आणि मराठा राजवटीविरोधात मजबूत राहिलेला किल्ला असं म्हणायचं होतं. झालेल्या चुकीबद्दल माफी असावी,”
गोव्याच्या पर्यटन मंत्री मनोहर अजगावकर यांनी याप्रकरणी चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
पर्यटन मंत्र्यांचं ट्विट खालीलप्रमाणे:
“हे चुकीने झालं आणि ट्विट डिलीट करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात येईल,”