मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे मोठ्या संख्येने कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांचे पगार कमी केले होते. १ एप्रिलपासून विस्तारा एअरलाइन्सने आपल्या पगार कपात केलेल्या काही कर्मचार्यांचा पगार पुन्हा पूर्ण देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचार्यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, पहिल्या स्तरापासून ते तिसऱ्या स्तरापर्यंतच्या कर्मचार्यांचे पगार पूर्ण देण्यात येणार आहे. तर, चौथ्या आणि पाचव्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात १५% आणि २५% कपात सुरू राहील.
जून २०२० मध्ये टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने कर्मचार्यांच्या पगारामध्ये ४०% कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पगारामधील ही कपात पूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत होती, परंतु नंतर ती ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आला. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कर्मचार्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, “आपल्या संचालक मंडळाने १ ते ३ स्तरावरील कर्मचाऱ्यांची वेतन कपात मागे घेतली आहे. परंतु ४ आणि ५ या स्तरावरील कर्मचारी आणि माझ्या पगारावरील कपात सुरुच राहील. स्तर चारसाठी वेतन कपात १५ टक्के तर स्तर ५ साठी २५ टक्के राहील.
पायलटच्या पगारामध्ये १०% कपात करण्याबाबतही पत्रात सांगितले आहे. महिन्याच्या बोनस आणि भत्त्यांमध्ये हे समायोजित केले जाईल असे सीईओंनी म्हटले आहे. त्याच वेळी, २०२०-२१ मधील वेरिएबल परफोर्मेंससाठी पात्र कर्मचार्यांना मे महिन्यात पैसे दिले जातील.
पाहा व्हिडीओ: