मुक्तपीठ टीम
काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लसीकरणाला गती मिळावी आणि दिव्यांग, व्याधिग्रस्तांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव मुंबई मनपाने तयार केला होता. हा प्रस्ताव मनपाने मंजुरीसाठी केंद्राला पाठविला होता. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडून फेटाळण्यात आला आहे.
केंद्राने वेगळ्या प्रस्तावाला मान्यता नाकारल्यामुळे मुंबईतील एका मोठ्या वर्गाचा लसीकरणाचा त्रास संपवण्याच्या प्रयत्नाला खिळ बसली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या दाव्यानुसार दावा केला आहे की, जर केंद्राने ‘डोअर डू डोअर’ लसीकरणाला मान्यता दिली असती तर जवळपास मुंबईतील दीड लाख लोकसंख्येला फायदा झाला असता. जे अंपग, दृष्टीहिन, जेष्ठ नागरिक आणि अंथरूणाला खेळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची आमची योजना आहे, ज्यामुळे लसीकरणासाठी लोकांना २ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही. पण त्याचवेळी लसीकरण केल्यानंतर लाभार्थींना निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असल्याचा दावा करत डोअर डू डोअर लसीकरण कसे उपयोगी पडणार नाही हे स्पष्ट केले आहे. “जर लोकांना घरीच लसीकरण सुरु केले तर त्यात बराच वेळा लागू शकतो. गती मिळण्यापेक्षा लसीकरण प्रक्रिया हळू होईल”, असे केंद्राला वाटते.