Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लॉकडाऊनविरोधात भाजपाशी राष्ट्रवादीची युती! उद्योगपती आनंद महिंद्रांचेही खडे बोल

March 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
lockdown (2)

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडून निर्बधांचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सगळीकडे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तावित लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजपकडून विरोध होत असतानाच आता सत्तेत सहभागी असणारी राष्ट्रवादी काँग्रेसही लॉकडाऊनविरोधात बोलू लागली आहे. त्याचवेळी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनच्या आर्थिक साइडइफेक्टकडे मुख्यमंत्री ठाकरेंचं लक्ष वेधलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कामगार मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. पण तरीही लॉकडाऊन राज्याला परवडणार नाही. तो जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढविण्यावर आणखी भर देण्यात यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.”

“याधीच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या देखील आहे. पण लोकांनीही काळजी बाळगणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियम पाळले गेले तर कोरोना प्रसार होणार नाही,” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आनंद महिंद्रांनी दिला मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

सामाजिक जाण ठेवण्यासाठी ओळखले जाणारे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही उद्धव ठाकरेंना ल़ॉकडाऊन विरोधातील सल्ला दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

anand mahindra

भाजपने याआधीच केला आहे लॉकडाऊनला विरोध

शिवसेनेचा सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्याआधीच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. सध्या दोन पक्षांच्या राजकीय युतीची चर्चा कम अफवा जोरात असताना लॉकडाऊनविरोधाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची युती दिसत आहे.

“राज्य सरकार सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली आहे. तसेच मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार? असा टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.

वाचा काय आहे लॉकडाऊनबद्दल भाजपाची संपूर्ण भूमिका:

लॉकडाऊनला भाजपाचा कडवा विरोध


Tags: कामगार मंत्री नवाब मलिकचंद्रकांतदादा पाटीलद्योगपती आनंद महिंद्राभाजपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

पबबाहेर अजय देवगणला मारहाण…व्हायरल व्हिडीओ फेक की फॅक्ट?

Next Post

गुन्हे महत्वाचे: 1) संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलांवतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूड उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्धाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)बहिणीनेच भावाचा खून केल्याच्या या धक्कादायक प्रकाराने बहीण-भावाच्या पवित्र नात्याला एकप्रकारे कलंकच लावला आहे,’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात नोंदवले. पुण्यातील बावधनमधील डीएसके राणवारा सोसायटीमधील जगजितकौर निर्मलसिंग या बहिणीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपिल फेटाळून लावताना न्या. साधना जाधव व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 3)पुण्यातील वारजे येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 4)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या आकाश बाळासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह तुर्भे येथील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मित्राला तुर्भे येथे सोडून बेलापूर येथे जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र गुरुवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी तुर्भे येथील तलावात आढळून आला. आकाश तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत एपीएमसी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 5)दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

Next Post

गुन्हे महत्वाचे: 1) संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलांवतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूड उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्धाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)बहिणीनेच भावाचा खून केल्याच्या या धक्कादायक प्रकाराने बहीण-भावाच्या पवित्र नात्याला एकप्रकारे कलंकच लावला आहे,' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात नोंदवले. पुण्यातील बावधनमधील डीएसके राणवारा सोसायटीमधील जगजितकौर निर्मलसिंग या बहिणीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपिल फेटाळून लावताना न्या. साधना जाधव व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 3)पुण्यातील वारजे येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 4)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या आकाश बाळासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह तुर्भे येथील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मित्राला तुर्भे येथे सोडून बेलापूर येथे जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र गुरुवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी तुर्भे येथील तलावात आढळून आला. आकाश तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत एपीएमसी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 5)दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!