गुन्हे महत्वाचे : 1)दारूच्या नशेत विवाहितेने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे यांनी प्रसंगावधान साधत तिचा जीव वाचविला. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. 2)मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 3)अभ्यासाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६९ वर्षांच्या शिक्षकास तर दुसऱ्या घटनेतील २४ वर्षीय युवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रकांत वामन भालेराव आणि राहुल दौलत बोडके असे या आरोपींची नाव आहेत. 4)नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. मुंबई शहरातील सर्वात मोठ्या ड्रग्ज सप्लायरच्या मुलाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. 5)तळोजा येथील पिसार्वे गाव परिसरामध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने व अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी संध्याकाळी सापळा लावून अटक केली आहे. जसविंदर दलजित सिंग व साबिर रझाक पठाण अशी या दोघांची नावे असून गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांजवळ असलेले १०३ ग्रॅम वजनाचे १० लाख ३० हजार रुपये किमतीचेहेरॉइन तसेच, त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली स्कुटी व पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.