Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 26, 2021
in सरकारी बातम्या
0
ambedkar

मुक्तपीठ टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राजकुमार सागर, गौतमीपूत्र कांबळे, सुहासिनी कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ७५ वर्षे पुर्ण केल्यानंतर स्वातंत्र्याचे किरण आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू शकलो का याचा विचार करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यभर याच भुमिकेतून संघर्ष केला. सामाजिक समानतेसाठी कृतीशील लढा दिला. आज या पुस्तकाच्या माध्यमातून कांबळे यांनी हीच भूमिका पुन्हा एकदा नव्याने जोरकसपणे मांडली आहे, ही निश्चित कौतूकाची आणि धाडसी बाब असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक समतेचे विचार मांडले ते आजही आपल्या सोबतच आहेत फक्त त्यांनी आपल्याला सामाजिक समतेचे हे देणं दिले आहे हे आपण विसरतो आहोत. त्याचे स्मरण हे लिखाण करून देते. आपण मुलत: माणूस आहोत. त्यानंतर आपल्याला जातपात आणि धर्म चिकटतो. ते मिरवतांना आपण ज्या गोष्टी जपतो त्या बरोबर आहेत की चुकीच्या असा मनात जेंव्हा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवतात त्यात हे पुस्तकही वाटाड्याचे काम करील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राला वैचारिक आणि सामाजिक सुधारणेची मोठी परंपरा लाभली असून आपले संविधान ही समतेचे मूल्य सांगते. आरक्षण, जातीय व्यवस्था आणि सामाजिक विकासाचा विचार करतांना लोकशाही मुल्यांची जपणूक महत्वाची ठरत असल्याचे पुस्तकाचे लेखक मधु कांबळे यांनी मनोगतात सांगितले. त्यांनी पुस्तक लिहिण्यामागची भुमिकाही याच दृष्टीकोनातून विषद केली. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 


Tags: book publicationchief minister uddhav thackerayज्येष्ठ पत्रकार मधु कांबळेडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रा. गौतमीपुत्र कांबळेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

रश्मी हेडे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’

Next Post

#मराठाआरक्षण “फक्त आर्थिक आरक्षण राहू शकते, सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची गरज!”

Next Post
maratha reservation

#मराठाआरक्षण "फक्त आर्थिक आरक्षण राहू शकते, सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची गरज!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!