मुक्तपीठ टीम
मुंबईमध्ये भांडूपमधील ड्रिम मॉलमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी गेलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालय मॉलमध्ये असल्याने धक्काच बसला. त्या म्हणाल्या, “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
कशी लागली आग
- भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली.
- ही आग शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
- या मॉलमध्ये सनराईज रुग्णालय चालवले जाते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर ती आग भडकली. मॉलमधील रुग्णालयातही वेगाने आग पसरली.
- या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.” या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून उरलेल्या ७४ रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.“७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टिस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७४ रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
भांडूप येथे सनशाईन रुग्णालयाला भीषण आग लागण्याची घटना घडली त्याप्रसंगी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी वृंद@mybmc @AUThackeray pic.twitter.com/UGNxcg3siy
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 25, 2021
अग्निशमन दलाची अधिकृत माहिती:
गुरुवारी दिनांक २५/०३/२०२१ रोजी ३रात्रौ २३:४९ वाजताच्या सुमारास ड्रीम्स मॉल, एल. बी. एस. मार्ग, भांडूप(प.) येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली.
सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन आणि १०-जम्बो वॉटर टँकर, १०-रुग्णवाहिका, ०१-टी. टी. एल. व ०१-बी.ए. वाहन उपस्थित आहेत. सदरची आग लेव्हल-४ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.