मुक्तपीठ टीम
मुंबईकर कलाकार तरुण रुबल नेगी यांनी आपले आयुष्य पूर्णपणे कलेसाठी समर्पित केले आहे. गेली दोन दशके ती चित्र काढत आहे. मुंबईत वावरताना झोपडपट्ट्यांचे कळकट-मळकट स्वरुप तिला अस्वस्थ करुन गेले आणि तिच्या मनात सृजन झाले ते झोपड्यांना रंगवण्याच्या संकल्पनेचे. त्यांनी आपल्या कलेने मुंबई झोपडपट्ट्यांना सजवून मुंबईचे सौंदर्य वाढविले आहे. जानेवारी २०१८ पासून त्यांनी ‘मिसाल मुंबई’ मोहीम सुरू केली, त्याअंतर्गत त्याच्या पथकाने झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे दीड हजार घरे सुंदर रंगांनी सजावट केली आणि भिंतींवर सुंदर चित्रे काढली. रुबलने आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास ३० झोपडपट्टया आणि खेड्यांचे चित्र बदलले आहे.
पंधरा वर्षात ८०० शिल्प आणि चित्रे तयार करणाऱ्या रुबल बालवाडी देखील चालवतात. तिथे मुलांना मूलभूत शिक्षण दिले जाते. त्यांची संस्था देशभरातील मुलांसाठी कला कार्यशाळेचे आयोजन करते. ती आपली कला लोकांशी संपर्क साधण्याचे माध्यम मानते. रूबलना पेंटिंग बनविण्यासाठी सामान्य लोक प्रेरणास्थान वाटतात. शिक्षण, महिला सक्षमीकरण, पेंटिंगमधील रोजगार सारख्या मुद्दय़ांवर ती लक्ष देते. त्याचबरोबर तिच्या कार्यशाळेत झोपडपट्टीतील लोकांना स्वच्छता व स्वच्छतेविषयी जागरूक केले आहे.
रुबलच्या म्हणण्यानुसार, या घरांवर रंगविलेले रंग काही वर्षानंतर नष्ट होतील. परंतु या रंगाद्वारे लोकांच्या विचारसरणीत होणारे सकारात्मक बदल नेहमीच त्यांना नवीन उर्जा देत राहतीत. रुबलच्या फाऊंडेशनने आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे चित्रांनी झोपडपट्ट्यांनाही प्रक्षणीय रुप मिळवून दिले आहे.
पाहा व्हिडीओ: