मुक्तपीठ टीम
ब्रिटनच्या राजघराण्यातील सक्सेस प्रिन्स हॅरी यांचा आपले राजघराणे सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय धक्कादायक मानला गेला होता. मात्र, त्यांनी तसे केले. आणि आता उपजीविकेसाठी नोकरही करु लागले आहेत. प्रिन्स हॅरी,ड्यूक ऑफ सक्सेस हे सॅन फ्रान्सिकोमधील एका कोचिंग फर्ममध्ये सीआयओ म्हणून जॉईन झाले आहेत.
‘बेटरअप’ नावाच्या स्टार्टअपमध्ये हॅरी आता नोकरी करताना दिसणार आहेत. ‘बेटरअप’ ही २०१३ मध्ये स्थापन करण्यात आलेली एक हेल्थ-टेक कंपनी आहे. जिची स्थापना व्यावसायिक आणि मानसिक आरोग्य प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीने हॅरीच्या पगाराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, त्यांच्या पद आणि कामाच्या स्वरुपाबद्दल थोडक्यात महिती दिली आहे.
हॅरी मनोरुग्ण रुग्णालयाची जबाबदारी घेणार आहेत. ते मनोविकार प्रकल्पाची देखभाल करणार आहेत. यासोबतच ते आणखी एक सामाजिक भूमिका निभावणार आहे. त्याअंतर्गत, रूपर्ट मर्डोच यांच्या सुनेच्या कॅथरीनच्या अॅस्पिन संस्थेत आयुक्त म्हणून चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्याचे ते काम करतील. ही त्यांची मानद सेवा असेल.
हॅरी सांगतात, “माझे असे मत आहे की आपल्या मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिल्यास अशा बर्याच संधी उघडल्या जातात. आपल्या क्षमतेला सर्वोत्तम बनवले पाहिजे. सीआयओ म्हणून माझी जबाबदारी अशी आहे की मी अशाप्रकारचे एक उत्तम वातावरण तयार करण्यासाठी मी योगदान देऊ शकेन जेणेकरुन लोक सहजपणे त्यांची उत्कृष्ट वर्जन बनवू शकतात.
बेटरअप संघाचा सदस्य म्हणून हॅरीच्या नियुक्तीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्सी रोबीचॉक्स म्हणाले की, हॅरी जगभरातील मानवी क्षमता वाढविण्यावर भर देईल. प्रशिक्षण, मार्गदर्शन या दृष्टीने बेटरअप अॅप एक उत्कृष्ठ व अग्रगण्य कंपनी मानली जाते. हॅरीने यापूर्वी नेटफ्लिक्स, स्पॉटिफाई सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आणि प्रोग्राम ऑफर केले आहेत.
बेटरअपचे नेटवर्थ १२,५५६ कोटी बेटरअप १२,५५६ कोटीची नेटवर्थ असणारी कंपनी आहे. कंपनीमध्ये २७० कर्मचाऱ्यांसोबत २००० कोच आहे. हे मानसिक स्वास्थ्याची ट्रेनिंग देतात. अमेरिकेतील स्पेस एजन्सी नासा,शेवरॉन, मार्स, वॉर्नर मीडिया यांसारख्या दिग्गज कंपन्या यांची सेवा घेतात. कर्मचार्यांच्या उत्तम विकासावर लक्ष केंद्रित असलेल्या कोचिंगची मागणी गेल्या एका वर्षात खूप वाढली आहे. त्याचा लाभ कंपनीला होत आहे.
पाहा व्हिडीओ: