Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांमध्ये काळा गहू लोकप्रिय, फायदा आणि आरोग्यही!

March 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
black

मुक्तपीठ टीम

काळ्या तांदळाच्या लागवडीबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण आता काळ्या गव्हाची लागवडही होऊ लागली आहे. हळूहळू या लागवडीला उत्तर भारतातील काही ठिकाणी वेग आला आहे. बिहारमधील नौबतपूर येथील सोना गावात प्रथमच काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. पूर्वी काळ्या गव्हाबद्दलची माहिती पटनामधील फक्त काही शेतकर्‍यांनाच होती, परंतु आता त्याची गुणवत्ता व नफा पसरू लागल्याने इतरही शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाचे पीक घेणे सुरु केले आहे. सामान्य गव्हाप्रमाणेच काळा गहू तयार होतो. या गव्हाचे उत्पादन जास्त होते. तसेच ते प्रति क्विंटल १५ ते १६ हजार रुपये दराने विकले जाते.

 

काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा चांगला असतो. काळा गहू आरोग्यासाठी चांगला आहे. एवढेच नव्हे तर, शेतकर्‍यांसाठी तो खूप फायदेशीर ठरत आहे. बाजारात प्रति क्विंटल १५ ते १६ हजार रुपये दराने विक्री केली जाते. हा दर सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त आहे. या गव्हाच्या लागवडीतून सर्वसाधारण गव्हापेक्षा जास्त नफा मिळवता येईल. काळा गहू खाण्यात स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त हे अनेक गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांना हा गहू खूप फायदेशीर मानला जात आहे.

 

शेतकऱ्यांना काळा गहू भावतो आहे. काळ्या गव्हाची गव्हाची पेरणी आठ ते दहा किलो प्रती गुंठा आहे. गव्हाचे उत्पादन हेक्टरी १५ ते २० क्विंटल आहे. त्यात वर्मी कंपोस्ट व डब्ल्यूडीसी खत वापरले गेले आहे. गव्हाचे हे वाण राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्था, मोहाली, पंजाब यांनी विकसित केले आहे. आता काही शेतकरी काळ्या गव्हाप्रमाणेच काळ्या तांदळाचीही लागवड करतात.

 

बर्‍याच वेळा लोक कर्करोगासारख्या आजाराचे बळी ठरतात. जर त्यांनी हा गहू वापरला तर ते या आजारांपासून वाचू शकतील, असे सांगितले जाते. सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हात अँथोसायनिनचे प्रमाण जास्त असते. सामान्य गव्हामध्ये पिगमेंटचे प्रमाण ५ ते १५ पीपीएम असते, तर काळ्या गव्हात पिगमेंटचे प्रमाण ४० ते १४० पीपीएम असते. अँथोसायनिन अँटीऑक्सिडेंट म्हणून शरीरात कार्य करते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Black wheatFarmerआरोग्यकाळा गहूफायदा
Previous Post

खते, बियाणे, उत्पादक कंपन्या…आज शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी काय ठरवलं?

Next Post

गगनयान मानव मिशनच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण

Next Post
gaganyan

गगनयान मानव मिशनच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!