आजचा दिवस हा सर्वात महाग दिवस ठरला आहे. आजच्या इंधन दरवाढीने मागील २५ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर, नव्वदीपार गेले आहेत. तर डिझेलच्या दराने ८० चा टप्पा ओलांडला आहे.
जगभरात कच्च्या तेलाचा भाव वाढत असल्याने देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव ही वाढला आहे. इंधन कंपन्यांनी गेले काही दिवस दर स्थिर ठेवले होते. मात्र कच्च्या तेलाचा भाव ५४ डॉलरपर्यंत वाढल्याने इंधन कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ झाली असून पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २६ पैशांनी महागले आहे. महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक महाग इंधनविक्री करणारे राज्य ठरले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली आहे, ज्यामुळे डिझेलचे दर २६ ते २९ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २१ ते २४ पैशांनी वाढले आहेत.
देशातील मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली – डिझेल ७४.३८ रुपये, पेट्रोल ८४.२० रुपये
कोलकाता – डिझेल ७७.९७ रुपये, पेट्रोल ८५.६८ रुपये
मुंबई – डिझेल ८१.७ रुपये, पेट्रोल ९०.८३ रुपये
चेन्नई- डिझेल ७९.७२ रुपये, पेट्रोल ८६.९६ रुपये