मुक्तपीठ टीम
उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजे एनआयएकडून शोध घेतला जात आहे. एनआयएने वाझे यांनी वापरलेल्या आणखी दोन महागड्या गाड्याही या पथकाने जप्त केल्या. एनआयएच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ठाण्यातील साकेत भागात वाझे यांच्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालून‘लँड क्रूझर प्राडो’ गाडीही जप्त केली.
याशिवाय आणखी एक मर्सिडीज कारही ताब्यात घेण्यात आली आहे. अद्याप या कारबद्दल कोणतीही माहिती एनआयएकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. या प्रकरणात एकूण ५ कार ताब्यात घेतल्या असून त्यात एक मर्सिडीज, एक स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारचा समावेश आहे. तसेच या गाड्या कुंभला हिल येथील एनआयएच्या कार्यालयात आणल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने गुरुवारी वाझे यांचे सहकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दोन पोलिसांना चौकशीसाठी बोलावले होते. तसेच २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ घराबाहेराल स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणात वाझे यांना शनिवारी रात्री एनआयएकडून अटक करण्यात आली आहे.