मुक्तपीठ टीम
देशाची शान वाढवणारा महाराष्ट्र देशासाठी संपत्ती निर्मितीतही अव्वल आहे. महाराष्ट्र राज्यात थोडेथाडके नाहीत तर ५६,००० करोडपती कुटुंबं आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. देशातील ४ लाख१२ हजार कोटी कुटुंबांपैकी महाराष्ट्रासह या पाच राज्यांमध्ये देशातील ४६ टक्के करोडपती राहतात.
श्रीमंतांच्या वार्षिक यादीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरुण इंडियाच्या संपत्ती अहवालानुसार, देशात गेल्या वर्षी ४.१२ लाख करोडपती कुटुंबे होती. भारतीय अर्थव्यवस्था ही वर्षाकाठी तिसऱ्या क्रमांकाची अब्जाधीश आणि सर्वात वेगवान संपत्ती निर्माण करणारी अर्थव्यवस्था आहे. दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न असणार्या कुटुंबाला डॉलरच्या हिशेबाने कोट्यधीश घर समजले जाते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त महाश्रीमंत!
• महाराष्ट्राचा राष्ट्रीय जीडीपीत १६ टक्के वाटा आहे. महाराष्ट्राचाच जीडीपी सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ५६,००० डॉलर्स-कोट्यधीश घरे आहेत.
• कोट्यधीश कुटुंबांची संख्या उत्तर प्रदेशात ३६,००० आहे. गेल्या १० वर्षांपासून येथील अर्थव्यवस्था दरवर्षी १०.६ टक्क्यांनी वाढत आहे.
• तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमध्ये ३५,००० डॉलर-कोट्यधीश घरे आहेत. मागील पाच आर्थिक वर्षांत त्यांची अर्थव्यवस्था १२.२ टक्क्यांनी घसरली आहे.
• चौथ्या क्रमांकावर कर्नाटकमध्ये ३३,००० कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दहा कोटी डॉलर्स इतके आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात जवळपास १० टक्के वाढ होत असून दरडोई उत्पन्न गेल्या २० वर्षात ११ पट वाढले आहे.
• गुजरातमध्ये २९,००० डॉलर्स-कोट्यधीश कुटुंब असून या राज्याचे पाचवे स्थान आहे.
• दहा लाख कोटी कुटुंबांच्या पहिल्या दहा राज्यांमध्ये पश्चिम बंगाल (२४,०००), राजस्थान (२१,०००) आणि आंध्र प्रदेश (२०,०००) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि तेलगाना या दोन राज्यांमध्ये १८,००० कोट्यधीश कुटुंब आहेत.
महानगरांमध्ये कुठे किती महाश्रीमंत?
• शहरांचा विचार केला तर राष्ट्रीय जीडीपीच्या ६.२ टक्के उत्पन्न करणार्या मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत.
• दिल्लीत १५,८६१ कोट्यधीश कुटुंब आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये राष्ट्रीय राजधानीचे योगदान ४.९४ टक्के आहे.
• कोलकत्तामध्ये राज्यातील २४,००० कोट्यधीश कुटुंबांपैकी जवळजवळ ४२ टक्के आहेत.
• बंगळुरू ७,५८२ कोट्यधीश कुटुंबांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
• भारतीयांच्या कोट्यधीश कुटुंबांमध्ये चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईमध्ये ४,६८५ कोट्यधीश कुटुंबे आहेत.
पाहा व्हिडीओ: